घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरभुजबळ भावूक होऊन म्हणाले, 'गोपीनाथ मुंडे असते तर OBC समाजावर संकट आलं...

भुजबळ भावूक होऊन म्हणाले, ‘गोपीनाथ मुंडे असते तर OBC समाजावर संकट आलं नसतं’

Subscribe

अंबड (जालना) – मनोज जरांगे यांनी जालना जिल्ह्यातून मराठ्यांना ओबीसींमधून कुणबी म्हणून आरक्षण देण्याची मागणी केली. त्याच जालना जिल्ह्यात ओबीसींची महाएल्गार सभा होत आहे. या सभेला संबोधित करताना ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना उजाळा दिला आणि आज ते ह्यात नाही, याबद्दल दुःख व्यक्त केले. यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, भाजप आमदार गोपीचंद पडळकर, ओबीसी नेते प्रकाश शेंडगे, महादेव जानकर, भाजप खासदार विकास महात्मे असे विविध पक्षांचे नेते मंचावर उपस्थित होते.

गोपीनाथ मुंडे आज असते तर ही संकटं आमच्यावर आली नसती. गोपीनाथ मुंडे यांनी ज्यांना-ज्यांना ओबीसींसाठी लढण्याची दीक्षा दिली आहे, त्या सर्वांना सोबत घेऊन आपल्याला लढायचे आहे, असे आवाहन छगन भुजबळांनी केले. गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या भाजप नेत्या पंकजा मुंडे या सभेसाठी येणार असल्याची चर्चा होती, मात्र त्या सभेला आलेल्या नाहीत. सभा स्थळावरील बॅनरवर मात्र त्यांचा फोटो आहे. मंडल आयोग लागू करा, ही मागणी याच जालना जिल्ह्यातून केली असल्याची आठवण छगन भुजबळांनी सांगितले.

- Advertisement -

मराठा समाजाचं एक दैवत निर्माण झाले. त्यांचे म्हणणे आहे की धनगर, तेली, माळी हे मधेच घुसले आहेत. त्यांना माहित नाही, की कालेलकर आयोग नेमल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरु यांनी प्रत्येक राज्यात या समाजाला आरक्षण देण्याचे सांगितले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत 340 कलमानुसार सांगितले होते, की या समाजाची अवस्था वाईट आहे, त्यांना आरक्षण दिलं पाहिजे.
त्यानंतर व्ही. पी. सिंगांनी मंडल आयोग लागू केलं. शरद पवार तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री होते, त्यांनी ओबीसींना वचन दिलं होतं, ते त्यांनी पूर्ण केलं. आम्हाला कोणीही घुसवलेलं नाही, असं सांगत भुजबळांनी मनोज जरांगेंचा नामोल्लेख टाळून त्यांच्यांवर निशाणा साधला.

आरक्षण गरीबी हटाव कार्यक्रम नाही

“कोणाचं खाता कोणाचं खाता? असं म्हणतो, पण तुझे खातो काय रे ?” असं म्हणते भुजबळांनी जरांगेंवर हल्ला चढवला. तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही. आरक्षण काय ते समजून घे आणि आम्हाला म्हणतो आरक्षण द्या आरक्षण द्या, असं म्हणत भुजबळांनी जरांगेंवर निशाणा साधला. मराठा तरुणांना मला सांगायचे आहे, या दगडाला शेंदूर लावून कोणता देव करायच आहे? त्याला आरक्षण कळेना, आरक्षण गरिबी हटावचा कार्यक्रम नाही, असं भुजबळ म्हणाले. आरक्षण हा गरीबी हटावचा कार्यक्रम नाही, हे आरक्षणाला विरोध करणाऱ्यांनी लक्षात घेतले पाहिजे. जे हजारो वर्षे दबले-पिचलेले होते, त्यांना सर्वांसोबत आणण्यासाठीची समता प्रस्थापित करणारी व्यवस्था आहे, हे समजून घेतले पाहिजे, असे छगन भुजबळांनी विरोध करणाऱ्यांना ठणकावून सांगितले.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -