OBC Reservation : निवडणुका लागल्यास एकत्रितपणे लढणार, बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया

OBC Reservation Balasaheb Thorat's said We will fight together if elections taken
OBC Reservation : निवडणुका लागल्यास एकत्रितपणे लढणार, बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया

भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचा आमचा अजेंडा आहे. सर्वोच्च न्यायालयाने येत्या २ दिवसांमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात यावा असा आदेश देण्यात आला आहे. यानंतर आता राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याच मार्ग मोकळा झाला आहे. परंतु राज्यात जर निवडणुका लागल्या तर महाविकास आघाडी एकत्रित निवडणूक लढवेल अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. पावसाळ्यात निवडणुका घेण्यात येण्याची शक्यता आहे. परंतु राज्य निवडणूक आयोगाचा अधिकार आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोग योग्य निर्णय घेईल असेही बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.

राज्याचे महसूल मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. यावर अशा वेळी राज्य सरकारची काय भूमिका असेल. राज्य शासन म्हणून एकत्र बसलो, मंत्रिमंडळाची चर्चा झाली. मुंबईत जो पाऊस चालतो आणि कोकणात जो पाऊस चालतो अशा परिस्थितीमध्ये निवडणुका घेणार कशा? ही वस्तुस्थिती आहे. हे निवडणूक आयोगाचे अधिकार आहेत. त्याप्रमाणे ते निर्णय घेतील असे बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे. त्याचे विश्लेषण राज्य निवडणूक आयोग करेल. ज्यावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रत येईल त्यावेळीच आपण काय करु शकतो हे ठरवू, निवडणूक आयोगाचे अधिकार आहेत. त्यांच्या अधिकारात काही निर्णय घेऊ शकतात. महाविकास आघाडी कायमच तयार आहे. निवडणुकीला घाबरलो असे काही नाही. निवडणुकीत एकत्रपणे चांगल्या पद्धतीने निवडणूक लढवू, भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचा आमचा नारा आहे.

फडणवीसांच्या टीकेवर थोरातांचा पलटवार

राज्य सरकारने वेळ वाया घालवला, ओबीसींचे नुकसान केलं अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. यावर बाळासाहेब थोरात यांनी पलटवार केला आहे. मुख्यमंत्र्यांनी सर्वांना विचारात घेऊन निर्णय घेतले आहेत. यामध्ये सर्वपक्षीय बैठका घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे असा कोणता दोष देण्याचा कारण वाटत नाही. आयोग आताही ओबीसी आरक्षणासंदर्भात काम करत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली नाही. एकत्र बसल्यावर चर्चा होईल. परंतु राज्य निवडणूक आयोगाचा अधिकार आहेत. त्यामुळे ते योग्य निर्णय घेऊ शकता असे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत.

राज ठाकरेंना राजकारण महत्त्वाचे

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भूमिकेबाबत बाळासाहेब थोरात यांना प्रश्न विचारण्यात आला होता. यावर थोरात म्हणाले की, त्यांना भोंगा महत्त्वाचा नाही तर राजकारण महत्त्वाचा आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करण्यात यावे या मताचे महाविकास आघाडी सरकार आहे. ज्यावेळी ते निर्णय असतात ते सर्वांसाठी असून ते सर्वांना पाळावे लागतील असे बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत.


हेही वाचा : भोंग्यांचा विषय फक्त एक दिवसाचा नाही, आंदोलन सुरुच राहणार, राज ठाकरे भूमिकेवर ठाम