ओबीसी आरक्षणासाठी भाजपचा मंत्रालयावर मोर्चा, प्रवीण दरेकर, मुनगंटीवार पोलिसांच्या ताब्यात

OBC reservation BJP's Morcha on Mantralaya Praveen Darekar Mungantiwar detained police
ओबीसी आरक्षणासाठी भाजपचा मंत्रालयावर मोर्चा, प्रवीण दरेकर, मुनगंटीवार पोलिसांच्या ताब्यात

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपकडून मंबईतील कार्यालयापासून ते मंत्रालयापर्यंत मोर्चा काढला होता. ओबीसींचे राजकीय आरक्षण जाण्यासाठी राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. मंत्रालयावर ओबीसी आरक्षणाविरोधातील मोर्चा आल्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. तसेच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि सुधीर मुनगंटीवार यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. भाजप नेते योगेश टिळेकर यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला होता.

भाजपने ओबीसी आरक्षणावरुन आक्रमक भूमिका घेतली आहे. महाविकास आघाडीविरोधात भाजपडून मोर्चा काढण्यात आला होता. मंत्रालयावर मोर्चा धडकल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले. राज्य सरकारविरोधात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा केली आहे. भाजप कार्यालयातील सर्व महत्त्वाच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यामध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार गोपीचंद पडळकर यांनासुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण गेल्याचा आरोप करण्यात आला आहे. भाजप कार्यालयाकडून मंत्रालयाच्या दिशेने मोर्चा निघाला होता. यादरम्यान पोलिसांनी मध्येच मोर्चा अडवण्यात आला होता. पोलिसांकडून मोर्चा थांबवण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनाही पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान यामध्ये महिला कार्यकर्त्यांचासुद्धा समावेश आहे.

मंत्रालयाकडील रस्त्यावर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. यानंतर आता पोलिसांनी थेट भाजप कार्यालय गाठले. या ठिकाणी मोर्चा अडवण्यात आला. भाजप कार्यालयात बड्या नेत्यांची बैठक झाली तसेच नेत्यांची भाषण झाली. यानंतर मोर्चा आक्रमक झाला आहे. मोर्चा पूर्ण न होताच पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. ठाकरे सरकारचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. दरम्यान महाविकास आघाडी सरकारविरोधात पोस्टरबाजीसुद्धा करण्यात आली आहे.


हेही वाचा : संभाजीराजेंनी शिवसेनेचे उमेदवार व्हावं हीच अपेक्षा, संजय राऊतांची प्रतिक्रिया