ओबीसी समाजाचे नुकसान होणार नाही, इम्पिरिकल डेटा गोळा करण्याच्या कामात सुधारणा : विजय वडेट्टीवार

मागील अनेक महिन्यांपासून सतत्याने राज्यात ओबीसी आरक्षणावरून(OBC Reservation) राजकारण सुरू असून सध्यस्थितीत राज्यात ओबीसींचा इम्पेरिकल डेटा (Empirial data of OBC) गोळा करण्याचे काम सुरु आहे. मात्र हे काम करताना एकसारख्या आडनावामुळे ओबीसींची संख्या कमी दिसेल, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले होते

OBC Reservation Commencement of the work of the Commission today said Vijay Wadettiwar
OBC Reservation: ओबीसी आरक्षणांसाठी समर्पित आयोगाच्या कामाला आजपासून सुरुवात - विजय वडेट्टीवार

मागील अनेक महिन्यांपासून सतत्याने राज्यात ओबीसी आरक्षणावरून(OBC Reservation) राजकारण सुरू असून सध्यस्थितीत राज्यात ओबीसींचा इम्पेरिकल डेटा (Empirial data of OBC) गोळा करण्याचे काम सुरु आहे. मात्र हे काम करताना एकसारख्या आडनावामुळे ओबीसींची संख्या कमी दिसेल, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले होते. यावर महाविकास आघाडीचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी उत्तर दिले आहे. “एकसारख्या आडनावाची बाब सरकारच्या लक्षात आली असून, त्यानुसार, सरकार काम करत आहे. शिवाय सुधारणा ही करत आहे. त्यामुळे ओबीसी समाजाचे नुकसान होणार नाही. दरम्यान, फडणवीसांच्या मताशी सहमत आहोत, पण सरकारही त्या दृष्टीने सुधारणा करत आहे” असे, विजय वडेट्टीवार यांनी म्हटले. (OBC Reservation Correction in collection of Empirial data by state government Vijay Vadettivar)

हेही वाचा – विधानपरिषदेत मविआचे ६ उमेदवारही निवडून येतील – बाळासाहेब थोरात

मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली. विजय वडेट्टीवार म्हणाले की, ‘एकाच आडनावाची राज्यात अनेक लोक आहे. महाराष्ट्रात जाधव आडनाव अनेकांचे आहे. त्यामुळे आडनावावरुन सॅम्पल सर्व्हे करायचा झाला तर ओबीसींची संख्या कमी जास्ती होईल आणि त्यातून समाजाचे नुकसान होईल. याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोललो. ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिवांशीही चर्चा झाली. मी देवेंद्र फडणवीस यांना आश्वस्त करु इच्छितो की यावर आमचे बारिक लक्ष आहे. ते बोलले त्यात काही अशी सत्य आहे. त्यांच्या मुद्द्याचं मी काही अंशी समर्थन करतो. पण ही बाब आमच्याही लक्षात आली आणि त्यानंतर आम्ही अलर्ट मोडवर आलो.”

“त्यानंतर आम्ही डेटा गोळा करताना त्यात दुरुस्ती करायचे ठरवले. आता डेटा गोळा करत असताना गावात त्या आडनावाची माणसे कुठल्या जातीची आहेत, कुठल्या कॅटेगरीची आहेत? याची माहिती आपण तिथल्या ग्रामपंचायतीकडून करुन घ्यायची आणि त्यापुढे तो कुठल्या कॅटेगरीचा आहे त्याची नोंद केली जाईल. आम्ही निश्चितरुपाने यात सुधारणा करु. आम्ही जे कमिशन नेमले आहे त्यांना आम्ही टर्म्स ऑफ रेफरन्समध्ये जाऊन काम करण्यास सांगितलं आहे.”, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले

“मधल्या काळात वेळ कमी होता, अशा स्थितीत आपल्याला सॅम्पल सर्वे करुनच काम करायचं होतं. मी असंही म्हणालो होतो की आपल्याकडे मोठी यंत्रणा आहे त्याचा वापर करा. २० लाख कर्मचारी आपल्याकडे आहेत. प्रत्येक ग्रामपंचायत कर्मचारी, शिक्षक, तलाठी, ग्रामसेवक असे सात – आठ लोकं आपल्याला प्रत्येक गावात मिळतील. त्यांनी जर एक गाव तीन चार दिवसांत सगळी वास्तविकता आपल्यासमोर येऊ शकेल, अशी विनंती मी मुख्यमंत्र्यांसह ग्रामविकास विभागाला केली होती”, असेही विजय वडेट्टीवार यांनी म्हटले.


हेही वाचा – ‘विधान परिषदेसाठी मतदान करायचं असेल तर नवी याचिका दाखल करा’