घरमहाराष्ट्रOBC Reservation: सर्व निवडणुकांसाठी अध्यादेश लागु होईल याची खात्री सरकार देईल का?,...

OBC Reservation: सर्व निवडणुकांसाठी अध्यादेश लागु होईल याची खात्री सरकार देईल का?, पंकजा मुंडेंचा सवाल

Subscribe

ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकार अध्यादेश काढणार आहे. मात्र, या अध्यादेशावरुन भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारला प्रश्न विचारला आहे. सर्व निवडणुकीसाठी नवा अध्यादेश लागू होईल याची सरकार खात्री देईल का? असा सवाल पंकजा मुंडे यांनी सरकारला केला आहे.

ओबीसींना राजकीय आरक्षणाचा लाभ देण्यासाठी राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अध्यादेस काढण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, पंकजा मुंडे यांनी ट्विट करत या अध्यादेशावरुन राज्य सरकारला प्रश्न विचारले आहेत. “सर्व निवडणुकीसाठी अध्यादेश लागु होईल याची खात्री सरकार देईल का? आता लागलेल्या निवडणुकीत लागु होईल का? ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत व्हावे ही काळाची गरज आहे,” असं पंकजा मुंडे यांनी ट्विट करत म्हटलं आहे.

- Advertisement -

याशिवाय, पंकजा मुंडे यांनी या निर्णयाचं स्वागत देखील केलं आहे. “ओबीसी आरक्षणाचा विषय हाताळताना अध्यादेश काढण्यात येईल असे ठरले त्यामुळे ‘देर आये दुरुस्त आये’ असे म्हणता येईल. अध्यादेश काढून काही अंशी न्याय मिळेल पण कायम स्वरूपी उपाय करण्यासाठी आणखी खंबीर पावलं उचलावी लागतील ती ही वेळेत,” असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

निर्णय घेऊन हा प्रश्न सुटणार नाही – देवेंद्र फडणवीस

राज्य सरकारच्या निर्णयाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलं आहे. “सरकारने अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय उशिराने घेतला असला तरी योग्य आहे. मात्र एवढा निर्णय घेऊन हा प्रश्न सुटणार नाही. हा प्रश्न सोडवायचा असेल तर त्यासाठी राज्य मगासवर्ग आयोगाकडून एक रिपोर्ट घ्यावा लागेल. ज्यामुळे सुप्रिम कोर्टाची ट्रिपल टेस्ट आपण पास करु शकू,” असं फडणवीस यांनी म्हटलं.


हेही वाचा – OBC Reservation: ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकार अध्यादेश काढणार

OBC Reservation : अध्यादेश काढणं हे सरकारला उशिरा सुचलेलं शहाणपण – देवेंद्र फडणवीस


 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -