Monday, June 21, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी शिवराज्याभिषेक दिनाच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजेंनी शेअर केला शिवकालीन 'होन'चा फोटो

शिवराज्याभिषेक दिनाच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजेंनी शेअर केला शिवकालीन ‘होन’चा फोटो

रायगडाच्या पवित्र भूमीत मिळालेल्या ऐतिहासिक 'होन'च्या साक्षीने यंदाचा राज्याभिषेक सोहळा साजरा होणार

Related Story

- Advertisement -

भाजप खासदार संभाजीराजे छत्रपतींनी (Sambhaji Raje Chhatrapati) दोन दिवसांपूर्वीच शिवराज्याभिषेकाच्या पार्श्वभूमीवर गर्दी न करण्याचे आवाहन केले. शिवराज्याभिषेक दिनाच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपतींनी ट्विटद्वारे शिवकालीन ‘होन’चा अत्यंत दुर्मिळ फोटो शेअर केला आहे. (occasion of Shiv Rajyabhishek Day Sambhaji Raje shared photo of ‘Hoan’rare coin ) ‘यंदाचा शिवराज्याभिषेक सोहळा अत्यंत दुर्मिळ व अमूल्य अशा ऐतिहासिक शिवकालीन ‘होन’च्या साक्षीने साजरा होणार आहे’,असे संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. पुढे ट्विटमध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, ‘स्वराज्याचे सार्वभौमत्न व संपन्नतेचे प्रतीक असणारा होन हे केवळ चलन नसून आपली अस्मिता आहे. हा राष्ट्राचा अमूल्य ऐतिहासिक ठेवा आहे. रायगडाच्या पवित्र भूमीत मिळालेल्या ऐतिहासिक ‘होन’च्या साक्षीने यंदाचा राज्याभिषेक सोहळा साजरा होणार’,असे संभाराजीराजे छत्रपतींने म्हटले आहे.


गेल्या वर्षीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करता आला नाही. यंदाही राज्यात कोरोनाचे सावट कायम आहे. शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा हा राष्ट्रीय उत्सव व्हावा ही माझी मनापासून इच्छा असल्याचे संभाजीराजेंनी म्हटले. गेल्या वर्षीही लोकांना घरी राहण्याचे आवाहन केले असता ते घरी राहिले त्यांचे मी आभार मानतो. यंदाची परिस्थितीही तशीच आहे. त्यामुळे ‘शिवराय मनामनांत शिवराज्याभिषेक दिन घराघरांत’ या भावनेतून हा सोहळा साजरा करा, असे आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी शिवप्रेंमींना केले आहे.

- Advertisement -

त्याचप्रमाणे मी सर्वाना शिवजयंती घरी राहून साजरी करा असे म्हणत असलो तरी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर ठाम आहे,असे संभाजीराजे यांनी म्हटले आहे. मराठा आरक्षणासंदर्भात ज्या पाच मागण्या केल्या आहेत त्या मागण्या मान्य केल्या नाही तर थेट रायगडावरुन आंदोलनाची भूमिका मांडू असा पुन्हा एकदा इशारा संभाजीराजेंनी दिला. मराठा समाजाला गृहीत धरु नका,रायगडावरुन लाखो बांधवांचा आवाज मांडणाचं असेही संभाजीराजे म्हणाले आहेत.


- Advertisement -

हेही वाचा – Maharashtra Unlock: ७ जूनपासून राज्यात पाच टप्प्यात अनलॉकची प्रक्रिया सुरु होणार, पहा नवीन नियमावली

 

 

 

- Advertisement -