घरताज्या घडामोडीराज्यात परतीच्या पावसाची चाहुल; ऑक्टोबर हिटमुळे तापमानात वाढ

राज्यात परतीच्या पावसाची चाहुल; ऑक्टोबर हिटमुळे तापमानात वाढ

Subscribe

मुंबईसह राज्यभरात ऑक्टोबर हिटची जाणीव होत असून उष्णतेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ऑगस्ट महिन्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यानंतर पावसाने दडी मारली असून, उष्णतेत मोठी वाढ झाली आहे. नमागील काही दिवसांपासून राज्यात उष्णतेत वाढ झाल्यामुळे परतीच्या पावसाचीही चाहूल लागली आहे.

मुंबईसह राज्यभरात ऑक्टोबर हिटची जाणीव होत असून उष्णतेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ऑगस्ट महिन्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यानंतर पावसाने दडी मारली असून, उष्णतेत मोठी वाढ झाली आहे. नमागील काही दिवसांपासून राज्यात उष्णतेत वाढ झाल्यामुळे परतीच्या पावसाचीही चाहूल लागली आहे. राज्याच्या अनेक भागांत परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. (october heat in many areas of maharashtra imd alert heavy rainfall)

राज्यात ढगाळ हवामानासह तुरळक ठिकाणी रिमझिम पावसाच्या सरी कोसळल्या. तसेच, बुधवारी उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मागील काही तासांत मध्य महाराष्ट्रातील नगर, नाशिक, सोलापूर, मराठवाड्यातील जालना, औरंगाबाद, परभणी, नांदेड जिल्ह्यांत अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला.

- Advertisement -

राज्यात विविध ठिकाणी पडलेल्या पावसाची नोंद

  • कोकण : मोखेडा 60, पालघर 30,
  • मध्य महाराष्ट्र : कर्जत 50, जेऊर, करमाळा, हर्सल 40, नेवासा, इगतपुरी 30, जामखेड, देवळा, श्रीगोंदा, शिरूर, कळवण प्रत्येकी 20, ओझरखेडा, सटाना, खंडाळा, पारनेर, दौंड, चास, तासगाव, माढा, चांदवड, महाबळेश्वर प्रत्येकी 10.
  • मराठवाडा : पातूर 60, वैजापूर, जिंतूर 50, धर्माबाद 40, जालना, परभणी, परांडा, भोकर, देगलूर, नांदेड प्रत्येकी 30, रेणापूर, कळंब, पूर्णा, वसमत, औंढा नागनाथ, अंबड, प्रत्येकी 20, अर्धापूर, आष्टी, मुदखेड, सेलू, लोहारा, भूम, मुखेड, शिरूर अनंतपाळ, औसा, निलंगा, खुलताबाद, किनवट प्रत्येकी 10.
  • विदर्भ : सालकेसा, तुमसर, पोंबुर्णा, गोरेगाव, गोंदिया, देवरी प्रत्येकी 10.

मिळालेल्या माहितीनुसार, मान्सूनने वायव्य भारतातून परतीचा प्रवास सुरू केला आहे. मागील आठवड्यात राजस्थानच्या खाजूवाला, बिकानेर, जोधपूर, आणि गुजरातच्या नालिया पर्यंतच्या भागातून मान्सून परतला आहे.

- Advertisement -

याशिवाय, येत्या 2 ते 3 दिवसांत वायव्य आणि मध्य भारताच्या काही भागातून मान्सून परत जाण्याची शक्यता आहे. विजांसह पावसाचा येलो अलर्ट धुळे, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, लातूर, हिंगोली या भागात देण्यात आला आहे.


हेही वाचा – 1 नोव्हेंबरला होणार महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची पुढील सुनावणी

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -