घरमहाराष्ट्र'दुसऱ्यांवर टीका करण्यापेक्षा सक्षम पर्याय द्या' चंद्रकांत पाटलांचं शरद पवारांना चोख उत्तर

‘दुसऱ्यांवर टीका करण्यापेक्षा सक्षम पर्याय द्या’ चंद्रकांत पाटलांचं शरद पवारांना चोख उत्तर

Subscribe

"स्वतःला प्रोजेक्शन मिळवण्यासाठी आपण दुसऱ्यावर टीका करून लोकांना विचलित करण्यापेक्षा तुम्ही पर्याय द्या". असा टोला सुद्धा चंद्रकांत पाटील(chandrkant patil) यांनी शरद पवारांना(sharad pawar) लगावला आहे.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे(shiv shahir babasaheb purandare) म्हणजे इतिहासातील एक असं पान ज्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य शिवकालीन इतिहासासाठी वाहून घेतलं. ‘बाबासाहेब पुरंदरे यांची भाषणं आणि त्यांच्या लिखाणाने शिवछत्रपतींवर अन्याय केला’ असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले. पुण्यातील(pune) एका कार्यक्रमात बोलत असताना शरद पवार यांनी मत मांडलं होतं. यालाच आता भाजपचे(bjp) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “स्वतःला प्रोजेक्शन मिळवण्यासाठी आपण दुसऱ्यावर टीका करून लोकांना विचलित करण्यापेक्षा तुम्ही पर्याय द्या”. असा टोला सुद्धा चंद्रकांत पाटील(chandrkant patil) यांनी शरद पवारांना(sharad pawar) लगावला आहे.

हे ही वाचा –  शरद पवारांची टोलेबाजी, म्हणाले पुण्यात गिरीश बापट कुठेही उभे राहतात अन..

- Advertisement -

महाराष्ट्र(maharahstra) कीर्ति सौरभ प्रतिष्ठान पुणे यांच्या तर्फे शिवशाहीर श्री बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार २०२२ चं आयोजन करण्यात आले होते. तो पुरस्कार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते देण्यात आला. डॉ. गो. बं. देगलूरकर यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. या पुरस्कार सोहळ्या दरम्यान भाजप(bjp) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील बोलत होते.

- Advertisement -

“मला या व्यासपीठावरून हेच मांडायचं होतं की स्वतःला प्रोजेक्शन मिळवण्यासाठी आपण दुसऱ्यावर टीका करून ज्या व्यक्तिमत्वाचा समाजाला उपयोग होणार आहे. त्या व्यक्तिमत्वाने जे संशोधन केलं ते संशोधन लोकांना उपयोगी पडणार आहे. त्यापासून लोकांना विचलित करतात. तुम्ही पर्याय द्या जे आहे ते नष्ट करायचं असेल तर त्याच्यापेक्षा प्रभावी तुम्ही पर्याय द्या की जो लोकांना पटला पाहिजे. लोकांना ते तुम्ही फुकट वाटा पण तुम्ही जे लिहिलेलं आहे ते खरं असेल त्याच्यामध्ये काही दम असेल तर लोक वाचतील” असं चंद्रकांत पाटील(chandrakant patil) म्हणाले आहेत.

हे ही वाचा – PM Modi Sharad Pawar Meet: शरद पवार आणि नरेंद्र मोदींची भेट, नेमकी चर्चा काय?

शरद पवार नेमकं काय म्हणाले 

“महात्मा फुले(mahatma phule) यांनी रायगडावरील शिवछत्रपतींची समाधी शोधली. त्यांनी शिवाजी महाराजांचा उल्लेख छत्रपती असा न करता ‘कुळवाडी भूषण’ असा केला. मात्र बाबासाहेब पुरंदरे यांनी खोटा इतिहास पसरवला. माझ्यामते शिवछत्रपतींवर इतका अन्याय कोणी केला नाही. शिवचरित्राच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेल्या बाबासाहेबांच्या लिखाणातून छत्रपती शिवजी महाराजांवर सर्वाधिक अन्याय झाला”, असं राष्ट्रवादीचे(ncp) सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले होते. नुकतेच पुण्यात इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे लिखित शिवचरित्र आणि विचारप्रवाह या ग्रंथाचे प्रकाशन झाले त्या कार्यक्रमात शरद पवारांनी(sharad pawar) हे मत मांडले होते.

हे ही वाचा – २०१४ नंतर आलेले आम्हाला हिंदुत्व शिकवताहेत, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

 

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -