घरमहाराष्ट्रस्त्रीशक्तीला बरोबरीचे स्थान देऊया; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

स्त्रीशक्तीला बरोबरीचे स्थान देऊया; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Subscribe

आपल्या संस्कृतीने स्त्रीला मोठा सन्मान दिला आहे. मातृशक्ती म्हणून स्त्रियांनीच या राष्ट्राचे भवितव्य घडवले आहे. राजमाता जिजाऊ माँ साहेब, पुण्यश्लोक अहिल्याबाई यांच्यापासून ते स्त्रीशिक्षणाचा पाया घालणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची प्रेरणा घेऊन अनेक माता-भगिनींनी विविध क्षेत्रात कर्तबगारी सिद्ध केली आहे

मुंबईः स्त्रीशक्ती, मातृशक्ती ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे. या शक्तीचा आदर करूया. त्यांना समानतेचे, बरोबरीचे स्थान देऊया, असे आवाहन करतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी साजऱ्या होणाऱ्या जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मुलींनीही आपल्यातील या शक्तीला ओळखून संधींची नवी क्षितिजे ओलांडण्याची हिंमत बाळगावी. त्यासाठी सर्वतोपरी पाठबळ दिले जाईल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

- Advertisement -

आपल्या संस्कृतीने स्त्रीला मोठा सन्मान दिला आहे. मातृशक्ती म्हणून स्त्रियांनीच या राष्ट्राचे भवितव्य घडवले आहे. राजमाता जिजाऊ माँ साहेब, पुण्यश्लोक अहिल्याबाई यांच्यापासून ते स्त्रीशिक्षणाचा पाया घालणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची प्रेरणा घेऊन अनेक माता-भगिनींनी विविध क्षेत्रात कर्तबगारी सिद्ध केली आहे. शासन म्हणून महिला विकासाच्या अनेक योजना, उपक्रम, प्रकल्प राबविण्यात येत आहेत. महाराष्ट्राचे एक लाख डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेचे स्वप्न साकारण्यात देखील आपल्या महिला शक्तीचा समसमान वाटा असणार आहे. त्या दृष्टीने आपण विकासाची धोरणे आखत आहोत. आपल्या मुलींना शिक्षण, रोजगार, उद्योजकता अशा सर्व क्षेत्रात संधी उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुलींनीही नवनव्या क्षेत्रातील संधी आजमावण्याची हिंमत बाळगावी, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे.

यंदा जागतिक महिला दिनाचे घोषवाक्य ‘समानता स्वीकारा’ असे आहे. या दिशेने आपल्या देशात आणि राज्यात या आधीच प्रयत्न सुरू झाले आहेत. ही समानता प्रस्थापित करणे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. ती ओळखून स्त्रियांचा आदर करूया, त्यांना बरोबरीचे स्थान देऊया. हाच स्त्रीशक्तीचा जागर ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

- Advertisement -

स्त्रीशक्तीला मान-सन्मान देण्याचा निर्धार करुया- अजित पवार

महाराष्ट्रातील स्त्रीशक्तीला त्यांचा हक्क, मान-सन्मान, सुरक्षित वातावरण देण्याचा आपण सर्वांनी निर्धार करूया. महाराष्ट्रातील स्त्रीशक्तीला मिळालेला महानतेचा वारसा त्या अधिक समर्थपणे पुढे नेत आहेत. शेती, नोकरी आणि व्यवसाय करुन आपल्या कुटुंबाला हातभार लावणाऱ्या राज्यातील समस्त माता-भगिनींचा आपल्याला अभिमान आहे. राष्ट्रनिर्मितीतील स्त्री शक्तीच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो, अशा शब्दात स्त्रीशक्तीचा गौरव करत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ‘आंतरराष्ट्रीय महिला दिना’निमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -