घरताज्या घडामोडीअखेर अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश!

अखेर अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश!

Subscribe

अभिनेत्री प्रिया लक्ष्मण बेर्डे यांनी आज खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पुण्याच्या निसर्ग येथील पक्षाच्या कार्यालयात हा प्रवेश झाला. प्रिया बेर्डे यांच्याबरोबर अभिनेते सिध्देश्वर झाडबुके, अभिनेते विनोद खेडेकर, लावणीसमाज्ञी शकुंतलाताई नगरकर, अभिनेत्री सुहासिनी देशपांडे, निर्माते संतोष साखरे, लेखक दिग्दर्शक डॉक्टर सुधीर निकम,  यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला.

पडद्यामागचे कलाकार, तंत्रज्ञ तसेच अनेक चित्रपट बॅकस्टेज कर्मचाऱ्यांसाठी काहीतरी करण्याची माझी इच्छा आहे अशी त्यांनी पक्ष प्रवेशा आधीच इच्छा बोलून दाखवली होती. त्याचबरोबर त्यांनी पक्ष प्रवेशावेळी त्यांच्या कामाचे मुद्देही मांडले. यावेळी कलाकारांच्या, बॅकस्टेजला काम करणाऱ्यांच्या कामाच्यावेळा, जाहिरांतींमध्ये जास्तीत जास्त मराठी चेहरा कलाकारांचा असावा यासाठी प्रयत्न करणार आहे, यासाठी राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांचे मार्गदर्शन मला मोलाचे ठरणार आहे असे प्रिया बेर्डे यावेळी बोलताना म्हणाल्या.

- Advertisement -

हे ही वाचा – भारताचा एकमेव मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म; अभिनेता पुष्कर श्रोत्री यांचा उपक्रम


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -