घरताज्या घडामोडीसंतापजनक! बलात्काराला विरोध केला म्हणून अल्पवयीन मुलाने तीला जाळले!

संतापजनक! बलात्काराला विरोध केला म्हणून अल्पवयीन मुलाने तीला जाळले!

Subscribe

या घटनेत तरूणी ८० टक्के भाजली, उपचारादरम्यान तीचा मृत्यू झाला.

छत्तीसगडमध्ये  एक धक्कादायक प्रकार घडला आहे. इयत्ता सातवीत शिकणाऱ्या एका १४ वर्षीय मुलीला पेटवून देण्यात आलं आहे. या मुलीने बलात्काराचा प्रयत्न हाणून पाडला त्यामुळे तीला पेटवून देण्यात आलं. यात ती ८० टक्के भाजल्यामूळे उपचारादरम्यान तीचा मृत्यू झाला. यातील आरोपी विद्यार्थी हे त्याच शाळेत शिकणारे आहेत. त्यातील एक अल्पवयीन आहे. छत्तीसगडमधील बेमेतारा जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे.

मृत्यूपूर्वी पीडित विद्यार्थीनीने गावातील दोन तरुणांनी तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. २२ जून २०२० रोजी ही घटना घडली. या दिवशी पीडित मुलगी तिच्या घरापासून जवळच असलेल्या शेतात काम करीत होती. यावेळी या मुलीच्या घरी कोणीच नव्हते. यावेळी आरोपी या मुलीला जबरदस्तीने तिच्या घरात घेऊन गेले आणि त्याच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी मुलीने त्यांना जोरदार विरोध केला. धक्कादायक बाब म्हणजे मुलीने बलात्काराचा प्रयत्न हाणून पाडल्याने त्या मुलांनी तिला पेटवून दिले. रायपूर पोलिसांनी याप्रकरणी झिरो एफआयआर दाखल केली आहे.

- Advertisement -

या घटनेतील आरोपी शरद जैसवाल तर दुसरा अल्पवयीन आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. पीडित मुलीचे कुटुंबीय घरी परतले आणि त्यांना आपली मुलगी कुठेच दिसली नाही. त्यामुळे त्यांनी तिला शोधायला सुरुवात केली तेव्हा ती शेतात जळालेल्या स्थितीत बेशुद्धावस्थेत पडलेली आढळून आली. त्यावेळी ती ८० टक्के भाजलेली होती. यावेळी ही घटना लक्षात आली.

लगेचच पीडित मुलीच्या घरच्यांनी तिला तातडीने रायपूर येथील रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, तिच्यावर उपचार सुरु असतानाच पोलिसांनी तिचा जबाब नोंदवून घेतला पीडित मुलीच्या जबाबानुसार पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर बालअत्याचार प्रतिबंध कायदा (पोक्सो) आणि भादंवि कलमांर्गत गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – अबब! सोन्याची किंमत रचणार इतिहास, दिवाळीत गाठणार उच्चांक!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -