ग्रीन- ऑरेंज झोनमध्ये ओलाची सेवा होणार सुरु; पण ओला टॅक्सीची एसी बंद  

नव्या नियमांतर्गत ओला टॅक्सीची एसी बंद असणार आहे. त्यामुळे उन्हाळ्यात प्रवाशांना थंडगार एसी हवेपासून मुकावे लागणार आहे.

अँप बेस्ट टॅक्सी सेवा पुरविणाऱ्या ओला कंपनी देशात नव्या नियमांसोबत टॅक्सी सेवा सुरु करण्याची घोषणा केली आहे. फक्त ओलाची सेवा रेड झोन वगळता ग्रीन व ऑरेंज झोनमध्येच सुरु राहणार आहे. तसेच नव्या नियमांतर्गत ओला टॅक्सीची एसी बंद असणार आहे. त्यामुळे उन्हाळ्यात प्रवाशांना थंडगार एसी हवेपासून मुकावे लागणार आहे.

कोरोना विषाणूमुळे जगभरात धुमाकूळ घातला असून देशभर लॉकडाऊन सुरु असून यात रेल्वे सेवासह सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद आहे. त्यामुळे गरोदर स्त्रिया, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग नागरिकांना अनेक समस्यासमोर जावे लागत होते. त्यांना तात्काळ टॅक्सी सेवा मिळावी म्हणून ‘ओला इमर्जन्‍सी’ सेवा मुंबईसह १५ प्रमुख शहरांमध्‍ये ही सेवा सुरू करण्‍यात आली आहे. आता त्याच बरोबर १०० हून अधिक शहरात ओला टॅक्सी सुरु होणार आहे. या सेवेत केंद्र शासनाने दिलेल्या सूचनानुसार चालक व प्रवासी यांच्या सुरक्षित प्रवासासाठी कंपनीने आखलेल्या १० महत्त्वाचे नियम आखले आहे. या नियमांची अंमलबजावणी करणे चालक व प्रवासी या दोघांनाही बंधनकारक असणार आहे. तसेच शासनाने ठरवलेल्या रेड झोन आणि कंटेनमेंट झोनमध्ये सेवा बंद ठेवण्यात आली आहे. विशेष म्हणजे लॉकडाऊन काळात ही सेवा सुरु करत असताना पूर्वी चालक प्रवाशांची मदत करत होता. मात्र, कोरोनामुळे चालक आणि प्रवाशांमध्ये कोणताही संपर्क येऊ नये, म्हणून प्रवाशांना स्वतःचे सामान स्वतःच उचलावे लागणार आहे. सामान गाडीत चढवताना आणि गाडीतून उतरवताना चालक मदत करणार नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. याशिवाय गाडीचे बुकिंग आणि पेमेंट ऑनलाईन पद्धतीने करावे, असे आवाहन कंपनीने केले आहे.

ओलाचा प्रवाशाला फिजिकल डिस्टन्सचे पालन करणे अनिवार्य आहेत. फक्त ओला टॅक्सीतून दोन प्रवासी प्रवास करता येणार आहे. या प्रवासादरम्यान ते दोन्ही प्रवासी परस्परविरोधी खिडक्यांशेजारी बसतील. तसेच प्रत्येक प्रवाशाला भाड्यावेळी चालकांना गाडीचे हँडल, इनर हँडल, सीट या सर्व गोष्टी स्वच्छ करणे बंधनकारक असेल. प्रवाशाने मास्क घातलेला नसेल तर चालकाला आणि चालकाने मास्क घातलेला नसेल तर ग्राहकाला सेवा रद्द करण्याचा अधिकार दिलेला आहे. एसी बंद असलेल्या हवेची ये-जा होण्यासाठी गाडीच्या खिडक्या उघड्या ठेवाव्या लागतील.