घरताज्या घडामोडीसंपूर्ण जुने नाशिक प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित

संपूर्ण जुने नाशिक प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित

Subscribe

रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता महापालिका आयुक्तांनी जाहीर केला मोठा निर्णय

जुने नाशिक परिसरातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता हा संपूर्ण परिसर महापालिका आयुक्तांनी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. तांत्रिक संकल्पनेनुसार परिसरात लॉकडाऊन जरी जाहीर करण्यात आले नसले तरीही अत्यावश्यक सुविधा वगळता सर्वच व्यवसाय या परिसरात पुढील आदेश येईपर्यंत बंद राहणार आहेत. त्यातल्या त्यात दिलासादायक बाब म्हणजे हा संपूर्ण भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर झाल्याने आता या भागातील बहुतांश संशयित रुग्णांच्या कोरोना टेस्ट केल्या जातील. त्यामुळे खरी रुग्णसंख्या लक्षात येऊन त्यांच्यावर वेळीच उपचार सुरु करता येतील.
जुने नाशिक परिसरातील नानावली, कुंभारवाडा, काझीगढी, शिवाजी चौक, बागवानपुरा, कमोद गल्ली व बेळे गल्ली, नाईकवाडीपुरा, काझीपुरा, झारकरी कोट, आझाद चौक, दूध बाजार, चव्हाटा, कोकणीपुरा, पिंझारघाट रोड, वझरे रोड, पाटील गल्ली, चौक मंडई, खडकाळी अअआणि भिमवाडी येथे प्रतिबंधित क्षेत्र तयार करण्यात आले होते. सद्यस्थितीत अनेक कोरोनाबाधित व्यक्ती या ठिकाणी आढळून आले आहे. त्यामुळे हे सगळेच प्रतिबंधीत क्षेत्र एकत्रित करण्यात आले आहे.

जुने नाशिकमध्ये आता काय होणार?

  • आत किंवा बाहेर जाण्याच्या मार्गावर बॅरिकेडींग टाकणार
  • अत्यावश्यक सेवा व तातडीच्या वैद्यकीय सेवा वगळता कोणत्याही प्रकारची ये-जा करता येणार नाही
  • या क्षेत्रामधील व्यक्ती घर सोडून बाहेर पडू शकणार नाही
  • प्रतिबंधित क्षेत्रात जाणारा व्यक्ती तपासणी केल्याशिवाय आत सोडता येणार नाही
  • प्रतिबंधित क्षेत्रात जाणार्‍या किंवा सेवा देणार्‍या व्यक्तींच्या दैनंदिन नोंदी ठेवण्यात येतील
  • साथरोग सर्वेक्षणामार्फत या व्यक्तींचा पाठपुरावा करण्यात येईल
  • प्रतिबंधित क्षेत्रात विशेष पथकाव्दारे घरोघरी आदेशापासून १४ दिवसपर्यंत सर्वेक्षण करुन संशयित रुग्णांचा शोध घेण्यात येईल
  • शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे संशयितांचे तपासणी नमूने घेण्यात येतील
  • बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यात येईल
  • दूध, किराणा, भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तूंबाबतचे नियोजन विभागीय अधिकारी करतील
  • प्रतिबंधित क्षेेत्रासाठी दिवस-रात्र बंदोबस्त असेल

नाशिक शहरातील बाधित रुग्णांची अशी आहे स्थिती

-आजचे कोरोना बाधीत- १६५+५९+१०(आत्ताचे) =एकूण२३४
-आत्ता पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ३००
-एकूण कोरोना रुग्ण-४६७१
-एकूण मृत्यू -१८८ (आजचे मृत्यू ०७)
-घरी सोडलेले रुग्ण- २९५६
-उपचार घेत असलेले रुग्ण – १५२७

संपूर्ण जुने नाशिक प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -