घरमहाराष्ट्रOld Pension Scheme: जुन्या निवृत्ती वेतनाबाबत अधिवेशनात लवकरच निर्णय; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

Old Pension Scheme: जुन्या निवृत्ती वेतनाबाबत अधिवेशनात लवकरच निर्णय; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

Subscribe

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे  लक्ष लागून राहिलेल्या जुन्या निवृत्ती वेतन योजनेबाबत येत्या 26 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या  राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशनात सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे.

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे  लक्ष लागून राहिलेल्या जुन्या निवृत्ती वेतन योजनेबाबत येत्या 26 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या  राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशनात सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय शासकीय अधिकाऱ्यांच्या  प्रमुख मागण्यांबाबतही अधिवेशनात तोडगा निघण्याची शक्यता आहे. (Old Pension Scheme Decision on old pension in session soon Chief Minister Eknath Shinde s assurance)

जुन्या निवृत्ती वेतन योजनेच्या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारण्याचा इशारा दिला होता. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहात निवेदन केल्यावर सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्याची तयारी दाखवली होती. या मागण्यांवर सरकार कोणताही निर्णय घेत नसल्यामुळे सरकारी अधिकारी- कर्मचाऱ्यांमध्ये  नाराजी निर्माण झाली होती.

- Advertisement -

जुन्या निवृत्ती वेतन योजनेबाबत लवकरच निर्णय?

महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचा 38 वा वर्धापन दिनाचा कार्यक्रम नुकताच वांद्रे येथील महासंघाच्या कल्याण केंद्रात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. जुन्या निवृत्ती वेतन योजनेबाबत येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातच सकारात्मक निर्णय घेणार, तसेच महासंघाच्या प्रमुख मागण्यांबाबत लवकरच तोडगा काढला जाईल, असे आश्वासन शिंदे यांनी दिल्याचे महासंघाने प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

तसेच, 5 हजार 400 रुपयांची ग्रेड पे ची मर्यादा सरसकट रद्द करणे, सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्याबरोबर कर्मचाऱ्यांच्या इतर मागण्यांबाबतही सरकार सकारात्मक असून, याबाबत मुख्य सचिवांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे महासंघाने म्हटले आहे. या कार्यक्रमाला महासंघाचे अध्यक्ष विनोद देसाई, मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे, सरचिटणीस समीर भाटकर आदी उपस्थित होते.

- Advertisement -

(हेही वाचा: IPL 2024: मुंबई इंडियन्समध्ये बंड? रोहित आणि हार्दिकमधील लढाई चव्हाट्यावर, नेमकं काय घडलं? )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -