घरमहाराष्ट्रशिक्षकांच्या जुन्या पेन्शनबाबत सकारात्मक मार्ग काढू; मुख्यमंत्री शिंदे यांचे आश्वासन

शिक्षकांच्या जुन्या पेन्शनबाबत सकारात्मक मार्ग काढू; मुख्यमंत्री शिंदे यांचे आश्वासन

Subscribe

वेंगुर्ला येथील महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या १७ व्या त्रैवार्षिक राज्य महाअधिवेशनाची सुरुवात गुरुवारी झाली. या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.  यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, शिक्षक हे भावी पिढीवर चांगले संस्कार घडवित असतात. जसे कुंभार हे मातीला आकार देतो तसेच शिक्षक हे भावी पिढी- नवीन पिढीला आकार देण्याचं, संस्कारित करण्याचं अतिशय मोलाचं काम करत असतात.

 

सिंधुदुर्गः शिक्षकांच्या जुन्या पेन्शनबाबत कायदेशीर, आर्थिक आणि तांत्रिक बाबी तपासून सकारात्मक मार्ग काढण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी दिले.

- Advertisement -

वेंगुर्ला येथील महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या १७ व्या त्रैवार्षिक राज्य महाअधिवेशनाची सुरुवात गुरुवारी झाली. या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.  यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, शिक्षक हे भावी पिढीवर चांगले संस्कार घडवित असतात. जसे कुंभार हे मातीला आकार देतो तसेच शिक्षक हे भावी पिढी- नवीन पिढीला आकार देण्याचं, संस्कारित करण्याचं अतिशय मोलाचं काम करत असतात.

पुढे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, चंद्रपूरमधील पालडोह मधील शाळा ३६५ दिवस सुरु आहे. तोरणमाळ येथील शाळेला आदर्श निवासी शाळा पारतोषिक मिळाले आहे. शिक्षकांचे यासाठी समर्पण महत्वाचे आहे. ६१ हजार शिक्षकांसाठी ११ कोटी देण्याच निर्णय तात्काळ घेतला. शिक्षकांच्या समस्या सोडविण्याला प्राधान्य दिले जाईल. शिक्षकांवर कुठल्याही प्रकारची बंधने आम्ही टाकणार नाही. शिक्षणाचा दर्जा उंचावला पाहिजे तसेच विद्यार्थ्यांचे जीवनमान उंचावले पाहिजे. या स्पर्धात्मक युगात आपण सर्व पुढे गेलो पाहिजे.

- Advertisement -

राष्ट्रीय स्तरावरील शिक्षण सर्वेक्षणामध्ये शिक्षकांनी मोठी झेप घेतली आहे. यात सरकारी शाळांचा वाटा खूप मोठा आहे. पालकांचा व समाजाचा सरकारी शाळेवरील विश्वास देखील आता वाढत चालला आहे. सरकारी शाळेतील विद्यार्थी आज कुठल्याही क्षेत्रात कमी नाही. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या कार्यमान प्रतवारी कामगिरी इंडेक्स मध्ये एकूण १००० गुणांपैकी महाराष्ट्राला ९२८ गुण मिळाले आहेत. त्यामुळे आपल्या महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक आला आहे. यामध्ये शिक्षकांचं मोठे योगदान आहे.  कितीही तंत्रज्ञान आले तरी शिक्षकांची जागा कोणीही घेऊ शकत नाही. तरुण पिढी सक्षम करण्यासाठी शिक्षकांचं योगदान फार महत्वाचे आहे. असेही मुख्यमंत्री म्हणाले.

नविन शैक्षणिक धोरणानुसार मातृभाषेवरील शिक्षणावर भर दिले जाईल. इंग्रजी गणित व विज्ञान या विषयांची आवड विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी यासाठी आपल्या सर्वांचा प्रयत्न सुरु आहे. केंद्र सरकारचे नविन शैक्षणिक धोरण हे भविष्य काळातील सुवर्णसंधी आहे. या धोरणानुसार राज्यातील सर्व मुला-मुलींना समान गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी राज्य शासनाने देखील केंद्र शासनाच्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार दिशादर्शक काम करुन सर्वसमावेशक निर्णय घेतले आहेत. शिक्षण व्यवस्था दर्जेदार करण्यासाठी जी रिक्त पदे आहेत ती भरण्यात येणार आहेत. तसेच केंद्र प्रमुखाची रिक्त पदे भरण्याचे काम सुरु आहे. शिक्षकांची सुमारे ३० हजार पदे लवकर भरले जातील. शिक्षकांच्या मागणीच्या सर्व त्रुटी दूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करु, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.

शिक्षकांच्या गाडीवर लागणार टीआर- मुख्यमंत्री शिंदे

डॉक्टर जीवदान देतात त्याचप्रमाणे शिक्षक हे जीवनाला दिशा देणारे काम करत आहेत. डॉक्टर जसे वाहनावर डीआर लावतात तसे शिक्षकांसाठी टीआर लावण्याबाबत विचार होईल. जेणेकरुन शाळेत लवकर पोहचता येईल. शिक्षकांवर जास्त बंधने केली जाणार नाहीत. मी आणि उपमुख्यमंत्री मिळून या सहा-सात महिन्यांमध्ये शेतकरी, शिक्षक, कष्टकरी, कामगार तसेच विद्यार्थीं या सर्वांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत, असा दावा शिंदे यांनी केला.

शिक्षकांच्या जुन्या पेन्शनबाबत सकारात्मक मार्ग काढू; मुख्यमंत्री शिंदे यांचे आश्वासन
Tejasvi Kalsekarhttps://www.mymahanagar.com/author/tejasvi-kalsekar/
तेजस्वी काळसेकर या प्रसारमाध्यम क्षेत्रात गेल्या ५ वर्षांपासून कार्यरत आहे. राजकीय, सामाजिक विषयांवर लिखाण करतात.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -