घरताज्या घडामोडीLata Mangeshkar : ठाकरे आणि मंगेशकर कुटुंबियांचे जुने स्नेहबंध, मुख्यमंत्र्यांकडून आठवणींना उजाळा

Lata Mangeshkar : ठाकरे आणि मंगेशकर कुटुंबियांचे जुने स्नेहबंध, मुख्यमंत्र्यांकडून आठवणींना उजाळा

Subscribe

भारतरत्न, गानकोकिळा आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका लता मंगेशकर यांचं आज निधन झालं. वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रूग्णालयात उपचार सुरू होते. गेल्या महिनाभरापासून त्या रूग्णालयात उपचार घेत होत्या. मात्र उपचारादरम्यान अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. लतादीदींबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी शोक भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच ठाकरे आणि मंगेशकर कुटुंबियांचे जुने स्नेहबंध असून त्यांनी आठवणींना उजाळा दिला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून आठवणींना उजाळा

ठाकरे आणि मंगेशकर कुटुंबियांचे जुने स्नेहसंबंध आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे लतादीदी, हृदयनाथ, आशाताई यांच्यासह सर्वांशीच जिव्हाळ्याचे नाते राहिले आहे. त्या निष्णात छायाचित्रकार होत्या. उत्तम कॅमेरे, वेगवेगळ्या लेन्सेस यांचा त्यांचा अभ्यास होता. त्यांच्याशी मध्यंतरी कधीमधी फोटोग्राफी, कॅमेरे याबाबत चर्चा व्हायची. माझ्या दोन्ही छायाचित्र संग्रहांविषयी त्यांनी आवर्जून दाद दिली होती.

- Advertisement -

काही निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी, काही कारणांनी चौकशी करण्यासाठी, त्यांचा फोन येत असे. मध्यंतरी मी रुग्णालयात असतांना त्या सातत्याने माझी विचारपूस करून आशीर्वाद देत असत. त्यांचा तो आपुलकीचा सुमधुर स्वर आता पुन्हा कानी पडणार नाही. त्यांचा तो स्वर हे आमच्यासाठी परमसौख्य होते. हे सौख्य नियतीने हिरावून घेतले आहे. ही त्यांची उणीव जाणवत राहील.

लतादिदींचे जाणे केवळ मंगेशकर कुटुंबियांवरच नव्हे तर त्यांच्या करोडो रसिक चाहत्यांवर आघात आहे. कुणी कुणाचं सांत्वन करायचं?, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोकभावना व्यक्त केली आहे.

- Advertisement -

रश्मी ठाकरेंनी व्यक्त केला शोक

लतादिदी आज आपल्यात नाहीत ही कल्पनाच सहन होत नाही. बाळासाहेबांनंतर त्या जणू आमच्या आधारच होत्या, सगळ्या सुख दुःखाच्या क्षणी आवर्जून पाठीशी राहणाऱ्या दिदींच्या जाण्यानं आमच्या परिवारावर मोठाआघात झाला आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

बाळासाहेब असतांना आणि नंतर देखील लतादिदी ठाकरे परिवाराचा एक अविभाज्य भाग होत्या. प्रसंग कुठलाही असो, दिदींचा फोन नेहमी असायचा. त्यांनी अनेक प्रसंगात आम्हाला मार्गदर्शन केलं आहे. एक वडीलधारी व्यक्ती म्हणून सतत पाठीशी उभ्या राहणाऱ्या दिदी आज आपल्यात नाहीत, माझी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, असं म्हणत रश्मी ठाकरे यांनी शोक व्यक्त केला.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे होत्या. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही लतादीदींच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मुंबईतील ब्रीच कँडी रूग्णालयात धाव घेतली होती. राज ठाकरे आणि मंगेशकर कुटुंबियांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत.

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी लता मंगेशकर यांना वाहिली श्रद्धांजली 

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. लतादीदींनी गायलेली गाणी माणसांना एकत्र जोडायची. असे अनेक प्रसंग आले जेव्हा त्यांनी आपल्या सैनिकांचे मनोबल वाढवले. त्यांच्या प्ररणेने लाखो तरूण संगीताशी जोडले गेले आहेत, अशा शब्दांत ओम बिर्ला यांनी शोकभावना व्यक्त केल्या आहेत.


हेही वाचा: Lata Mangeshkar : स्वर युगाचा अंत झाला, मातृतुल्य आशीर्वाद हरपला ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली शोकभावना


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -