घरमहाराष्ट्रजेजेतील इंट्रा व्हॅस्कूलर लिथोट्रीप्सी पद्धतीने वाचवले वृद्धाचे प्राण

जेजेतील इंट्रा व्हॅस्कूलर लिथोट्रीप्सी पद्धतीने वाचवले वृद्धाचे प्राण

Subscribe

६३ वर्षीय वृद्धावर या पद्धतीने पहिल्यांदाच शस्त्रक्रिया

मुंबईतील जेजे या सरकारी हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदाच इंट्रा व्हॅस्कूलर लिथोट्रीप्सी पद्धतीने केलेल्या शस्त्रक्रियेमुळे एका ६३ वर्षीय वृद्धाचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. जेजेमध्ये अशा पद्धतीने पहिल्यांदाच शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. मुंबईचे रहिवासी ६३ वर्षीय दिनकर गोरडे यांना काही दिवसांपूर्वी छातीत वेदना आणि कळ येत असल्याची तक्रार घेऊन जेजे हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. ईसीजी केल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे निदान झाले. काही काळासाठी तात्पुरते उपचार देऊन त्यांची अँजिओग्राफी करण्याचा निर्णय घेण्यात आला. अँजिओग्राफी करताना त्यांच्या हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांत जवळपास ९० टक्क्यांपेक्षा जास्त अडथळे म्हणजेच ब्लॉक आढळले. पण, साधारणत: एखाद्या रुग्णाच्या हृदयात ज्या प्रकारचे ब्लॉक आढळतात त्यापेक्षा वेगळ्या स्वरुपाचे हे ब्लॉकेजेस होते. शिवाय, रक्तवाहिन्यांच्या काही कठीण भागात आणि आवरणात कॅल्शिअमचे थर जमा झाले होते. त्यामुळे, रक्तवाहिन्या कडक झाल्या होत्या. त्यांना बायपास शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देखील देण्यात आला. पण, त्यांच्या तब्येतीच्या अडथळ्यांमुळे बायपास करणे कठीण होते. म्हणून त्यांच्या नातेवाईकांनी अँजिओप्लास्टी करण्याचा आग्रह केला. अशा परिस्थितीत साधारणपणे अशा रक्तवाहिन्यांमधील कॅल्शिअमचा अडथळा दूर करण्यासाठी ‘रोटा अब्लेशन’ पद्धतीचा वापर करण्यात येतो. पण, या परिस्थितीत या पद्धतीचा वापर केला असता तर रक्तवाहिन्यांच्या आतल्या आवरणात जमा झालेले कॅल्शिअमचे अडथळे पूर्णत: दूर झाले नसते. त्याचा फायदा रुग्णाला जास्त झाला नसता.


हेही वाचा – ‘या’ रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी ई-सायकाल सेवा


दरम्यान, डॉक्टरांनी या रुग्णावर इंट्र व्हॅस्कूलर लिथोट्रीप्सी ही पद्धत वापरुन शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. ही पद्धत परदेशात आणि काही खासगी हॉस्पिटलमध्ये वापरली जाते. ज्याचा खर्च सामान्यांना न परवडणारा असतो. या पद्धतीचा वापर आतापर्यंत कोणत्याही सरकारी हॉस्पिटलमध्ये झालेला नाही. शिवाय, ही पद्धत खर्चिक असल्याने ती वापरलीही जात नाही. खासगी हॉस्पिटलमध्ये या शस्त्रक्रियेला जवळपास ८ ते ९ लाख रुपये खर्च येतो. तर, सरकारी हॉस्पिटलमध्ये याचा खर्च २.५ लाख एवढा आहे.

- Advertisement -

एका तासात पार पाडली शस्त्रक्रिया

जेजे हॉस्पिटलमधील सहयोगी प्राध्यापक डॉ. नागेश वाघमारे यांच्या टीमने ही शस्त्रक्रिया एका तासात पार पाडली. या शस्त्रक्रियेमध्ये जी रक्तवाहिनी आधी १.८ मिमी एवढी आकुंचन पावली होती. तिला ३.३ मिमी एवढी प्रसारित करण्यात आली आणि रुग्णाच्या हृदयाला योग्य पद्धतीने रक्तपुरवठा सुरू झाला. या पद्धतीत रुग्णाच्या आकुंचन पावलेल्या रक्तवाहिन्यांमध्ये कॅथेटर टाकून फुग्याच्या साहाय्याने शॉक देऊन अडथळे दूर केले जातात. अशा पद्धतीचा वापर सध्यातरी कोणत्याच हॉस्पिटलमध्ये केला जात नाही.

जर अशा या उपचार पद्धतीचा वापर करायचा असेल आणि रुग्णांना त्याचा फायदा मिळवून द्यायचा असेल तर काही सामाजिक संस्थांकडून किंवा इतर मार्गांनी सकारात्मक पावले उचचली गेली पाहिजेत असे मत डॉ.वाघमारे यांनी व्यक्त केले आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -