घरताज्या घडामोडीओमर अब्दुल्लाह ७ महिन्यांनंतर मुक्त

ओमर अब्दुल्लाह ७ महिन्यांनंतर मुक्त

Subscribe

जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लाह यांना आठ महिन्यांच्या दीर्घ अशा कालावधीतनंतर आज मुक्त करण्यात आले. जवळपास २३२ दिवस ओमर अब्दुल्लाह यांना कस्टडीत ठेवण्यात आले होते. जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा काढल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. गेल्या वर्षी ४ ऑगस्टला त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. पब्लिक सेफ्टी एक्टनुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती.

नॅशनल कॉन्फरन्सचे नेत असलेल्या ओमर अब्दुल्लाह यांना ५ ऑगस्ट २०१९ मध्ये अटक करण्यात आली होती. याआधी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सांगितले होते की ओमर अब्दुल्लाह यांना लवकर मुक्त करण्यात यावे. त्यानंतर केंद्रानेही एका आठवड्यात त्यांना सोडण्यात येणार आहे असे स्पष्ट केले. केंद्र सरकारला उच्च न्यायालयाने सांगितले होते की ओमर अब्दुल्लाह यांना सोडले नाही तर अब्दुल्लाह यांच्या बहिणीने न्यायलायात दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू करण्यात येईल. ओमर अब्दुल्लाह यांची बहिणी सारा पायलट यांनी लोक सुरक्षा कायद्याअंतर्गत नजरबंदीच्या कायद्याला आव्हान दिले आहे. ओमर अब्दुल्लाह यांचे फेसबुक अकाऊंट वापरून जो गैरवापर करण्यात आला आहे, ते खाते त्यांचे नसल्याचे बहिणीने यांचिकेत स्पष्ट केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -