घरभक्तीशिर्डीपाठोपाठ पंढरपुरातील श्रीविठ्ठल, कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी रात्री ९ नंतर 'नो एन्ट्री'

शिर्डीपाठोपाठ पंढरपुरातील श्रीविठ्ठल, कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी रात्री ९ नंतर ‘नो एन्ट्री’

Subscribe

राज्यात ओमिक्रॉन व्हेरिएंटचा धोका अधिक वाढत असून कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटपेक्षा हा व्हेरिएंट अधिक वेगाने पसरतोय. असे असतानाही देशात ख्रिसमस आणि न्यू ईअर सेलिब्रेशनची धूम पाहायला मिळतेय. मात्र ओमिक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेता आता राज्य सरकारकडूनही खबरदारी घेतली जातेय. अशात गर्दी नियंत्रित आणण्यासाठी राज्य सरकारने काही कडक नियमावली पुन्हा जाहीर केली आहे. या नियमावलीची आता राज्यातील काही मुख्य देवस्थांनी अंमलबजावणी सुरु केली आहे. शिर्डीच्या साईबाबा मंदिर प्रशासनाने ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर भाविकांना मंदिरात रात्री ९ नंतर दर्शनासाठी प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला आहे.

या पाठोपाठ आता कोल्हापुरातील करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर, ज्योतिबा मंदिर, आणि श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर यांच्यासह अनेक मंदिरांनी दर्शनासाठी रात्री ९ नंतर ‘नो एन्ट्री’ असा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाविकांना आता रात्री ९ नंतर या मंदिरांत दर्शनासाठी परवानगी नसेल. त्यामुळे ख्रिसमस आणि न्यू ईअरनिमित्त देवस्थानांना रात्री भेट देणाऱ्या भाविकांचा हिरमोड झालाय.

- Advertisement -

याशिवाय दर्शन आणि दर्शन रांगांमध्ये देखील बदल करण्यात आला आहे. याशिवाय या सर्व देवस्थानांमध्ये दर्शनासाठीही नियमांचे काटेकोर पालन करण्यात येणार आहे. यापूर्वी ज्य़ोतिबा मंदिर दर्शनासाठी पहाटे ४ ते रात्री ११ वाजेपर्यंत दर्शनासाठी खुले होते. मात्र आता सकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे.

पंढरपूर मंदिरात रात्री ८.३० पर्यंत दर्शन रांगा

पंढपूरातील श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात २६ डिसेंबरपासून भाविकांच्या मुख दर्शन वेळेत बदल करण्यात आलाय. सकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत मुख दर्शन घेऊ शकतील, तर दर्शन रांगाही रात्री ८.३० वाजता बंद करण्यात येईल. अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी दिली आहे. त्यामुळे रात्री ८.३० नंतर भाविकांना मंदिरात दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार नाही.

- Advertisement -

अंबाबाई मंदिरात रात्री ९ पर्यंत दर्शनासाठी परवानगी

महाराष्ट्रामध्ये साडेतीन शक्तीपीठांपैकी एक समजली जाणार्‍या कोल्हापूरच्या करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाईच्या मंदिराची वेळ बदलण्यात आली आहे. दरम्यान आता अंबाबाईच्या मंदिरात भाविकांना रात्री ९ नंतर प्रवेश मिळणार नाही. त्यामुळे भाविक सकाळी ६ ते रात्री ९ या वेळेतच दर्शनासाठी मंदिरात जाऊ शकणार आहेत. पण मंदिरात सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन करण्याच्या सुचना पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने दिल्या आहेत. अंबाबाई मंदिरात दर शुक्रवारी होणाऱ्या देवीच्या पालखी सोहळ्यासाठीही कडक नियमावली करण्यात आली आहे.

शिर्डीतील साईबाबा मंदिर ९ नंतर दर्शनासाठी बंद

शिर्डीतील श्री साईबाबा मंदिर रात्री ९ नंतर दर्शनासाठी बंद राहणार असल्याची माहिती साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली आहे. त्यामुळे सकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत भाविकांना श्री साईबाबांचे दर्शन घेता येणार आहे. मात्र रात्री १०. ३० वाजता होणारी श्रींची आरती आणि पहाटे ४.३० वाजताची काकड आरती नियमित होणार आहे. याकरिता भाविकांना प्रवेश दिला जाणार नाही. राज्यात जमावबंदीचे आदेश असल्याने साईबाबा संस्थानने श्री साईप्रसादालय, लाडू विक्री काऊंटर, कॅन्टिन आदी सुविधा रात्री ९ वाजेनंतर बंद राहणार आहेत.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -