घरCORONA UPDATEOmicron Variant: अलर्ट! राज्यातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या वाढली, आज २३ नव्या रुग्णांची...

Omicron Variant: अलर्ट! राज्यातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या वाढली, आज २३ नव्या रुग्णांची नोंद

Subscribe

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गुरुवारी रात्री १० वाजता टास्क फोर्ससोबत बैठक घेणार

राज्यातील कोरोनाचा धोका वाढताना दिसत आहे. राज्यात आज कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटची संख्या वाढली असून कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गुरुवारी रात्री १० वाजता टास्क फोर्ससोबत बैठक घेणार आहेत. राज्यात २३ नव्या ओमिक्रॉन बाधितांची नोंद करण्यात आली आहे. यातील २२ रुग्ण राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने तर १ रुग्ण राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळेने बाधित म्हणून घोषित केला आहे.

राज्यात आज नोंद करण्यात आलेल्या ओमिक्रॉनच्या २३ नव्या रुग्णांपैकी १३ रुग्ण हे पुण्यातील आहेत. पुणे मनपा आणि पुणे ग्रामीण येथील प्रत्येकी ३ रुग्ण आहेत. तर पिंपरी चिंचवड मधील ७ रुग्ण. त्याचप्रमाणे मुंबईत आज ५ ओमिक्रॉन बाधितांची नोंद करण्यात आली आहे. उस्मानाबादमध्ये २ तर  ठाणे मनपा, नागपूर मनपा आणि मीरा भाईदर मनपा प्रत्येकी  एका रुग्णाची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisement -

राज्यात आज आढळलेल्या नव्या २३ ओमिक्रॉन बाधित रुग्णांमुळे राज्यात आतापर्यंत नोंद करण्यात आलेल्या ओमायक्राँन रुग्णांची संख्या ८८ झाली आहे. यापैकी ४२ रुग्णांची RTPCR चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

आज आढळलेल्या २३ रूग्णापैकी १६ हे आंतररष्ट्रीय प्रवासी आहेत तर ७ रुग्ण त्यांचे निकटसहवासित आहेत.
२३रुग्णांपैकी ६ रुग्ण हे मध्यपूर्व देशातून आले आहेत. ४ रुग्ण युरोप, प्रत्येकी २ रुग्ण हे घाना आणि द आफ्रिकेतून आले आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येकी १ रुग्ण हा सिंगापूर आणि टांझानिया येथून आले आहेत. यापैकी ४ रुग्ण १८ वर्षाखालीलतर २ जण ६० वर्षांवरील आहेत.

- Advertisement -

आज आढळलेल्या २३ रुग्णांपैकी १७ रुग्ण लक्षणेविरहित असून ६ रुग्णांना सौम्य लक्षणे आहेत. तसेच
१८ रुग्णांचे लसीकरण पूर्ण झाले आहे तर एका रुग्णांचे लसीकरण झालेले नाही, तर ४ रुग्ण लसीकरणासाठी पात्र नाहीत.

 ठाणे शहरात आढळला ओमीक्रॉनचा पहिला रुग्ण

पश्चिम आफ्रिका या देशातील घाणा येथून ठाण्यात आलेल्या एका ४० वर्षीय नागरिकाला ओमीक्रॉनची लागण झाल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले आहे. तो ठाणे शहरातील पहिलाच रुग्ण ठरला आहे. त्याच्या ठाणे महापालिकेच्या पार्किंग प्लाझा या सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत. तसेच त्याच्या संपर्कात आलेले त्याची पत्नी आणि दोन मुले हे मात्र निगेटिव्ह असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर ठाणे जिल्ह्यात नवीमुंबई, मीरा- भाईंदर येथे ही प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. त्याचबरोबर वसई-विरार येथेही एक रुग्ण आढळून आला आहे.

तो रुग्ण १४ डिसेंबर रोजी घाणा या देशातून ठाण्यात आल्यानंतर त्याला दोन दिवसांनी म्हणजे १६ डिसेंबर ला त्रास होऊ लागला. तातडीने त्याची कोरोना चाचणी केल्यावर तो पॉझिटिव्ह आढळून आला. त्यानंतर त्याला महापालिकेने रुग्णालयात दाखल केले आहे. याच दिवशी त्याची ओमीक्रॉनची चाचणी देखील करण्यात आली. त्याचा अहवाल ठाणे महापालिकेला गुरुवारी सायंकाळी प्राप्त झाला आहे. त्यानुसारच तो ठामपामधील पहिला रुग्ण ठरला आहे. रुग्ण सापडल्याने मास्क वापरावा, सोशलडिस्टन्सचे पालन करावे असे आवाहनही ठामपाकडून करण्यात आले आहे.

राज्य कोरोना अपडेट

राज्यातील कोरोना रुग्णांचा विचार केला असता आज राज्यात १ हजार १७९ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर १७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच मागील २४ तासात ६१५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील कोरोना रुग्णसंख्या आणि कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंट रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे राज्यासाठी पुन्हा एकदा नवे आव्हान उभे ठाकले आहे. याच संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री टास्क फोर्ससोबत बैठक घेऊन चर्चा घेणार आहेत.


हेही वाचा – Coronavirus In School: आणखी एका शाळेत कोरोनाचा विस्फोट; २९ विद्यार्थी पॉझिटिव्ह

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -