घरCORONA UPDATEOmicron Variant : ओमिक्रॉन व्हेरीएंटच्या संकटामुळे देशात लसीकरणाचा वेग मंदावला

Omicron Variant : ओमिक्रॉन व्हेरीएंटच्या संकटामुळे देशात लसीकरणाचा वेग मंदावला

Subscribe

देशात कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन विषाणूचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. यात २ डिसेंबरला देशात ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर रुग्णसंख्या १० च्या वर पोहचली आहे. अशात केंद्र आणि राज्य सरकारकडून लसीकरणाचा वेग वाढण्याची घोषणा करण्यात आली. जगभरातील ३० हून अधिक देशांमध्ये बूस्टर डोसचा वेग वाढवण्यात आला. अमेरिका, युरोपसह बहुतांश देशांमध्ये बूस्टर डोस देणे सक्तीचे करण्यात आले. मात्र भारतात बूस्टर डोस लांबच पण सुरु असलेल्या लसीकरणाचा वेगही आत्ता मंदावला आहे.

देशात २ डिसेंबरला रोज सरासरी ८१.३९ लाथ लसीकरण झाले. मात्र हीच संख्या आता ७४.४४ लाखांवर पोहचली आहे. जगभरात लसीकरणाचा वेग वाढला असताना भारतात मात्र हेच प्रमाण ८.५ टक्क्यांपर्यंत घटले आहे. झारखंड , पंजाब, बिहार, उत्तर प्रदेश व महाराष्ट्रातील ५० टक्के प्रौढ लोकसंख्येला लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. यात लहान मुलांच्या लसीकरणास अद्याप सुरुवात झालेली नाही. जगातील १०० हून अधिक देशांमध्ये लहान मुलांचे लसीकरण सुरु झाले असताना भारतात मात्र मुलांच्या लसीकरणासाठी दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ प्रतिक्षा करावी लागू शकते.

- Advertisement -

यात महाराष्ट्राचा विचार केला असता १० हून अधिक जिल्हे लसीकरणाच्या बाबतीत मागे आहेत. यात जळपास १.७५ टक्के लोकांनी लसीचा दुसरा डोस घेतलेला नाही. विशेष म्हणजे ठाणे, नाशिक, जळगाव, नगर, नांदेड, सोलापूर, औरंगाबाद, बीड, यवतमाळ, लातूर असे दहा जिल्हे लसीकरणाच्या बाबतीत पिछाडीवर आहेत.

यात मुंबईत सर्वाधिक म्हणजे १३.९४ टक्के, पुणे ११.४८ टक्के, ठाणे ८.१६ टक्के, नाशिक ४.८६, नागपूर ४.५९ टक्के लसीकरण झाले. यात जिल्ह्यात एकूण ४३.१४ लसीकरण म्हणजे ५ कोटी १९ लाख १५१३ डोस दिले आहेत. उर्वरित जिल्ह्यांत ५६.८६ टक्के लसीकरण म्हणजे ६ कोटी ८४ लाख १६,७२७ डोस दिले आहेत. यात ९ नोव्हेंबरला राज्याने लसीकरणाचा १० कोटींचा टप्पा पार केला आहे. तर २५ नोव्हेंबरला ११ कोटींचा टप्पा पार केला आहे. यात १८ ते ४४ वयोगटातील ७६.६९ टक्के लोकसंख्येने लसीचा पहिला डोस घेतला, तर ४५ पेक्षा अधिक वयाच्या ८५.२५ टक्के लोकसंख्येने किमान एक डोस मिळाला आहे.

- Advertisement -

लसीकरणाचे उद्दीष्ट गाठणे अशक्यच

गुजरात, मध्य प्रदेश, केरळ आणि हिमाचल प्रदेश वगळता हिमाचल प्रदेश वगळता एकाही राज्यात गेल्या ११ महिन्यांत ७० टक्के पेक्षा जास्त प्रौढ लोकसंख्येनेला दोन्ही डोस देण्यात आलेला नाही. झारखंड, पंजाब आणि उत्तर प्रदेश स्थिती सर्वात बिकट आहे. या राज्यात लसीकरणाचा वेग वाढला नाही तर पुढील ११ महिन्यांतही ही राज्ये १०० टक्के प्रौढ लोकसंस्ख्येला दोन्ही डोस देऊ शकणार नाही. मात्र लहा मुलांना लसीकरणासाठी मोठी वाट पाहावी लागू शकते.


Omicron Variant: मुंबईत आज, उद्या जमावबंदी; औरंगाबादहून निघालेल्या MIMच्या रॅलीला मुंबईत नो एंट्री


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -