घरमहाराष्ट्रOmicron: राज्यावर ओमिक्रॉनचं संकट, जमावबंदीत 'हा' नियम मोडल्यास ५० हजारांचा दंड

Omicron: राज्यावर ओमिक्रॉनचं संकट, जमावबंदीत ‘हा’ नियम मोडल्यास ५० हजारांचा दंड

Subscribe

मास्कशिवाय भाजीपाला मिळणार नाही.

कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉन आता परदेशानंतर भारतातही धोकादायक होताना दिसत आहे. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्य सरकारे सतर्क झाली असून त्यांनी कडक निर्बंध लागू करण्याचे आदेश जारी केले आहेत. ओमिक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात बाधितांची संख्या १०० च्या पुढे गेली आहे. यामुळे मुंबईतील १६० वर्षे जुन्या भाजी मार्केटमध्ये ग्राहकांना मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. जर कोणी मास्क लावला नाही तर त्याला भाजी दिली जाणार नाही. यासोबतच सोशल डिस्टन्सिंगची मार्गदर्शक तत्त्वेही जारी करण्यात आली आहेत.

मास्कशिवाय भाजीपाला नाही

ओमिक्रॉनची दहशत पाहता दक्षिण मध्य मुंबईतील प्रसिद्ध १६० वर्षे जुन्या भायखळा भाजी मंडईने मास्क अनिवार्य आहे, असा आदेश जारी केला आहे. भायखळा भाजी मार्केटला दररोज ७ ते १० हजार ग्राहक आणि छोटे किरकोळ व्यापारी भेट देतात. त्यामुळे या भाजी मंडईत मास्कशिवाय येणाऱ्या कोणत्याही ग्राहकाला भाजीपाला दिला जाणार नाही, असा आदेश बाजार समितीने जारी केला आहे.

- Advertisement -

५० हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो

नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करताना, महाराष्ट्र सरकार आणि मुंबई महानगरपालिकेने सर्व निर्बंध लागू केले आहेत. जिथे ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या पार्टीवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच प्रशासनाच्या नियमानुसार कोणत्याही भागात एका ठिकाणी ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्र जमता येणार नाही. एवढेच नाही तर कोणी नियम मोडल्यास ५०० रुपये दंड भरावा लागणार आहे. उल्लंघन केल्याबद्दल आयोजकांना ५०,००० रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो.

ओमिक्रॉन महाराष्ट्रात वेगाने पसरतोय

ओमिक्रॉनचा सर्वाधिक फटका बसलेल्या महाराष्ट्रात, बाधितांची संख्या १०८ वर पोहोचली आहे. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत राज्यात ओमिक्रॉनचे २० नवीन रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या २४ तासांत महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे २० नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ११ म्हणजेच ५० टक्के पेक्षा जास्त मुंबईत आढळून आले आहेत. याशिवाय पुण्यात ६, साताऱ्यात २ आणि अहमदनगरमध्ये १ रुग्ण आढळून आला आहे. त्याच वेळी, आतापर्यंत देशात ओमिक्रॉन संक्रमितांची संख्या ३९१ वर पोहोचली आहे, त्यापैकी १२४ रुग्ण बरे देखील झाले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – राज्यात कोरोना रुग्णांमध्ये होतेय वाढ


 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -