घरCORONA UPDATEOmicron Variant : राज्यात कोणतेही नवीन निर्बंध नाहीत, आरोग्यमंत्र्याची माहिती

Omicron Variant : राज्यात कोणतेही नवीन निर्बंध नाहीत, आरोग्यमंत्र्याची माहिती

Subscribe

राज्यात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटबाधित रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत ओमिक्रॉनचे १२ हून अधिक रुग्ण आढळले आहेत. अशातच आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यात सध्या कोणतेही नवीन निर्बंध लावले जाणार नसल्याचे जाहीर केले आहे. केंद्रीय औषध मानक तज्ञ संस्थेची आज जालन्यात बैठक झाली. या बैठकीदरम्यान आरोग्यमंत्री राजेश टोपे बोलत होते. यावेळी बोलताना टोपे यांनी, आपल्याला लहान मुलांचं लसीकरण आणि बूस्टर डोस संदर्भात निर्णय होणं अपेक्षित आहे.असे सांगितले.

परदेशातून राज्यात आलेल्यांचा शोध सुरु

केंद्र सरकारकडून ओमायक्रॉनमुळे ३१ जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय उड्डाणाला स्थगिती देण्यात आलीय. महाराष्ट्रात उड्डाणाबाबत केंद्र सांगेल त्या आदेशाची राज्यात अंमलबजावणी केली जाईल. परदेशातून राज्यात आलेल्यांचा शोध सुरु, वेळप्रसंगी पोलिसांची मदत घेऊन त्यांना शोधणार, त्यांच्या चाचण्या करणार करणार असल्याचे टोपे यांनी सांगितले. परदेशातून आलेले अनेक जण बेपत्ता झाले असून त्यांना शोधण्यासाठी मिशन मोडवर काम सुरू आहे. वेळप्रसंगी पोलिसांची मदत घेतली जात असून कोणत्याही परिस्थितीत या लोकांना शोधून त्यांची टेस्ट केली जाणार असल्याची माहिती टोपे यांनी दिली.

- Advertisement -

महाराष्ट्रात संक्रमित व्यक्तीकडून कोरोना संसर्ग होण्याचं प्रमाण वाढलं आहे. याबाबत काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही. मात्र नागरिकांनी लसीकरण तातडीनं करून घ्यावे. कोरोना नियमांचं पालन करावे असंही ते म्हणाले.

… तर लसीकरण गरजेचे 

औरंगाबादमध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी दुसऱ्या डोसचे लसीकरण केल्याची खात्री करूनच विद्यार्थी आणि शिक्षकांना महाविद्यालयात बसू द्या अन्यथा बसू देऊ नका असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहे. या आदेशाचं समर्थन करत नाही. मात्र लसीकरण ऐच्छिक जरी असलं तरी ते गरजेचं आहे. आज जरी हा निर्णय कायद्यात बसत नसला तरी ते गरजेचं आहे. राज्यात सध्या कोरोना संक्रमित व्यक्तींना आपण विलीगीकरण करत आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांची आपण ट्रॅकिंग, टेस्टिंग केली जात आहे. जे लोक दोन महिन्यांपूर्वी राज्यात विदेशातून आलेले आहे त्यांना शोधून त्यांचे नमुने जिनोमिक सिक्वेसिंगसाठी पाठवले जात असल्याच टोपे यांनी सांगितलं.

- Advertisement -

सांगलीत दक्षिण आफ्रिकेतुन आलेला एक रुग्ण दगावला आहे. या रुग्णाचा कोविड रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. मात्र त्याच्या चाचणीचा नमुना जिनोमिक सिक्वेसिंगसाठी पाठवण्यात आला आहे याबाबत विचारलं असता याबाबत जिनोमिक सिक्वेसिंग अहवाल आल्यानंतरच बोलता येईल अशी माहिती टोपे यांनी दिली.

नाशिक जिल्ह्यातील मुंडेवाडी येथे आश्रमशाळेत १५ विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे.या ठिकाणी जिनोमिक सिक्वेसिंग पूर्ण करून घेतलं जाईल. शिवाय अत्यावश्यक गोष्टी केल्या जातील अशी माहिती त्यांनी दिली.

सोलापूर जिल्ह्यात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ५५ सरपंचांना लसीकरण करण्यात मदत करत नसल्याप्रकरणी नोटीस बजावली आहे. लसीकरणासाठी राज्यातील सरपंचांनी मदत करावी. त्यांच्या मदतीशिवाय लसीकरणाला वेग येणं शक्य नाही. ते जबाबदार लोकप्रतिनिधी गाव स्तरावर असतात. त्यामुळे राष्ट्रीय कामात ते मदत करत नसतील तर ते चुकीचं आहे. त्यामुळे त्यांनी सहकार्य करावं असं आवाहन टोपे यांनी सरपंचांना केलंय.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -