घरताज्या घडामोडीOmicronचा वाढत्या अनुषंगाने राज्यात जिनोम सिक्वेंसिंगच्या लॅब वाढणार; निर्बंध पुन्हा लादले जाणार...

Omicronचा वाढत्या अनुषंगाने राज्यात जिनोम सिक्वेंसिंगच्या लॅब वाढणार; निर्बंध पुन्हा लादले जाणार का?; काय म्हणाले टोपे?

Subscribe

राज्यात ओमिक्रॉन रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. काल, रविवारी एकाच दिवसात ओमिक्रॉनच्या ७ रुग्णांची नोंद राज्यात झाली. त्यामुळे महाराष्ट्रातील एकूण ओमिक्रॉनग्रस्तांची संख्या ८वर पोहोचली. त्यामुळे ओमिक्रॉनच्या रुग्णांची वाढती संख्या पाहता राज्य सरकार अलर्ट मोडवर आले आहे. आज याबाबत टास्क फोर्सची बैठक पार पडली. या बैठकीत ओमिक्रॉनच्या फैलावाच्या अनुषंगाने राज्यात आणखीन २ जिनोम सिक्वेंसिंगच्या लॅब वाढवण्यात याव्यात असे मत व्यक्त केल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. तसेच पुन्हा राज्यात परिस्थितीतनुसार निर्बंध लावायचे की नाही याबाबत विचार केला जाईल, असे टोपे म्हणाले.

नक्की काय म्हणाले राजेश टोपे?

माध्यमांशी बोलताना राजेश टोपे म्हणाले की, ‘ट्रँकिंग, ट्रेसिंग आणि टेस्टिंग यासंदर्भातील काम सुरू आहे. विमानतळावर स्क्रिनिंगच काम मोठ्या प्रमाणात केले जात आहे. दररोज ५ हजाराच्यावर प्रवासी हाय रिस्क देशातून येतायत. याचे १०० टक्के स्क्रिनिंग केले जातेय. यामधील पॉझिटिव्ह आलेल्यांचे नमुने जिनोम सिक्वेंसिंगसाठी पाठवले जातात. पण सध्या जिनोम सिक्वेंसिंग करण्याच्याबाबी खूप वाढल्या असल्यामुळे आपल्या जवळ आज असलेल्या तीन जिनोम सिक्वेंसिंग करण्याच्या लॅब आहेत, बीजे मेडिकल पुणे, कस्तुरबा गांधी मुंबई, केंद्र शासनाची नॅशनल इस्टिट्यूट वायरोलॉजी पुणे या तीन पेक्षा आणखीन दोन लॅब वाढवाव्यात असे म्हणणे टाक्स फोर्सचे चेअरमन ओक यांचे आहे. एक औरंगाबाद आणि एक नागपूराला जिनोम सिक्वेंसिंगची लँब तयार करण्यात येईल. संभाव्य वाढणाऱ्या ओमिक्रॉनच्या वाढणाऱ्या संख्या पाहता जिनोम सिक्वेसिंग या महत्त्वाचा भाग असणार आहे. सध्या तीन लॅबवर जास्त भार पडेल आणि त्यामुळे अचानकपणे वाढ होण्यापेक्षा आता दोन लगेचच लॅब वाढवण्याच्या संदर्भात परवानगी मिळावी अशा संदर्भात त्यांचा आग्रह आहे. तो विषय शासनस्तरावर आणि मुख्यमंत्री स्तरावर मांडून लवकरच मान्यता घेण्याचा प्रयत्न करू. ‘

- Advertisement -

कोरोना निर्बंध लावण्याबाबत काय म्हणाले टोपे?

‘शिथिल केलेले निर्बंध पुन्हा लावणे हे लोकांसाठी जाचक आणि कठीण होईल. त्यामुळे परिस्थितीवर आपण लक्ष्य ठेवू आणि परिस्थिती कशी आहे, त्या अनुषंगाने मग केंद्र शासनाचे मार्गदर्शन आणि टास्क फोर्सचे मार्गदर्शन, मुख्यमंत्र्यांचे मत या सगळ्याच्या अनुषंगाने पुढील गोष्टी ठरवू. आज शाळा सुरू झाल्या आहेत, ज्यांनी सुरू केल्या नाहीत त्यांनी शाळा सुरू कराव्यात. अशी आमची सूचना आहे. कोविड विरोधातील वर्तन दररोज आपण पाळावे आणि लसीकरणावर अधिक जोर द्यावा,’ असे राजेश टोपे म्हणाले.

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -