घरताज्या घडामोडीKirit Somaiya : आता पुढचा नंबर अनिल परबचा लागणार, किरीट सोमय्यांचा परबांना...

Kirit Somaiya : आता पुढचा नंबर अनिल परबचा लागणार, किरीट सोमय्यांचा परबांना इशारा

Subscribe

मागील काही दिवसांपासून ठाकरे सरकारमधील बड्या नेत्यांवर ईडी आणि आयकर विभागाचं धाडसत्र सुरू आहे. राज्याचे अल्पसंख्याक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ईडीने अटक केली आहे. त्यानंतर आता पुढचा नंबर राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांचा असल्याची चर्चा अधिक दिवसांपासून राज्यात सुरू आहे.

मागील काही दिवसांपासून ठाकरे सरकारमधील बड्या नेत्यांवर ईडी आणि आयकर विभागाचं धाडसत्र सुरू आहे. राज्याचे अल्पसंख्याक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ईडीने अटक केली आहे. त्यानंतर आता पुढचा नंबर राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांचा असल्याची चर्चा अधिक दिवसांपासून राज्यात सुरू आहे. मात्र, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करत आता पुढचा नंबर अनिल परबचा लागणार, असं म्हणत एक सूचक इशारा अनिल परब यांना सोमय्यांनी दिला आहे.

किरीट सोमय्यांचं ट्विट काय? 


आता अनिल परबचाही नंबर लागणार. अनधिकृत, बेनामी रिसॉर्ट आणि रिसॉर्ट बांधकामसाठी आलेला पैसा याची चौकशी होणार, भारत सरकारने दापोली कोर्टात तक्रार दाखल केली आहे. या संदर्भात ३० मार्च रोजी सुनावणी होणार असल्याचं ट्विट सोमय्यांनी करत एकप्रकारे परबांना इशाराच दिलेला आहे.

- Advertisement -

किरीट सोमय्या यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, आता पुढचा नंबर अनिल परबांचा आहे. मुंबई महापालिकेचे स्थायी समिती सभापती यशवंत जाधव यांच्या घरावर आयकर विभागाने धाड टाकली. यामध्ये ३४ ठेकेदारांची सखोल माहिती महापालिकेकडून आयकर विभागाने मागवली आहे. तसेच तीन अधिकाऱ्यांची नावे आली असून त्याचा अभ्यास सुरू आहे. या तपासात ईडी आणि कंपनी मंत्रालयाने देखील रस दाखवल्याचं सोमय्या म्हणाले.

घोटाळेबाजांना उघड करणं हा जर सोमय्यांचा गुन्हा असेल तर मी एक हजार वेळा करणार. जर मी राजकीय बळाचा दुरूपयोग केला असेल तर माझ्याविरूद्ध कारवाई करा, असं किरीट सोमय्या म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – पुण्यातील शाळेत फीबाबत विचारणेसाठी आलेल्या पालकांना महिला बाऊन्सरकडून मारहाण

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -