Saturday, June 3, 2023
27 C
Mumbai
घर उत्तर महाराष्ट्र १०फेब्रुवारीला अमित शहांसह भाजपचे १०मंत्री, २३खासदार, १०५आमदार, असंख्य पदाधिकारी नाशकात

१०फेब्रुवारीला अमित शहांसह भाजपचे १०मंत्री, २३खासदार, १०५आमदार, असंख्य पदाधिकारी नाशकात

Subscribe

नाशिक : आगामी महापालिका, लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर नाशिकमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत १० व ११ फेब्रुवारी रोजी दोन दिवसीय राज्यस्तरीय अधिवेशन आयोजीत करण्यात आले आहे. शहा यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये प्रचाराचे रणशिंग फुंकले जाणार असून स्थानिक भाजपकडून अधिवेशनाची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. या पार्श्वभुमीवर बुधवारी भाजपच्या वसंतस्मृती कार्यालयात नियोजनासाठी बैठकीचे आयोजन करीण्यात आले होते.

या अधिवेशनाच्या निमित्ताने २३ खासदार, राज्य मंत्रिमंडळातील भाजपचे १० मंत्री व १०४ आमदारांची उपस्थितीही असणार आहे. जवळपास एक हजाराहून अधिक भाजपचे कोअर कमिटी पदाधिकारी अधिवेशनासाठी उपस्थित राहणार आहे. भाजप वसंतस्मृती कार्यालयात झालेल्या बैठकीप्रसंगी प्रदेश मुख्यालय प्रभारी तथा उत्तर महाराष्ट्र संघटन मंत्री रवी अनासपुरे यांनी, प्रदेश कार्यकारिणी यशस्वी करण्यासाठी कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांनी स्वत: झोकुन देउन काम करावे असे सांगितले. यावेळी आ.प्रा.देवयानी फरांदे यांनी आपल्या भाषणातून बोलतांना शहर सजावट करतांना शहराचा काणाकोपरा भाजपामय झाला पाहिजे. पोस्टर,बॅनर लागले पाहिजे शक्य त्या ठिकाणी रोशषणाई करावी अशा सूचना दिल्या.

- Advertisement -

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी बैठकीसाठी विविध समित्यांची निर्मिती करण्यात आली असून समित्या अध्यक्षांनी आपल्या समितीतील सहकार्यासमवेत खांदयाला खांदा लावून काम करावे व रोज कार्याचा तपशील शहराध्यक्षांना सादर करावा. यावेळी भाजपा ज्येष्ठ नेते विजय साने यांनी आतापर्यंत नाशकात झालेल्या प्रदेश कार्यकारिणीतील विविध अनुभवांचे कथन केले. अधिवेशनात महत्त्वाचे ठराव पारित करून ते राज्य मंत्रिमंडळामार्फत अंमलबजावणीबाबत निर्णय होतील असेही सूत्रांनी सांगितले. अधिवेशनानिमित्त नाशिकवर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचीही सभा घेण्याचे नियोजन आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -