घरमहाराष्ट्रशिंदे गटातील ४० आमदारांसह ५५ आमदारांना शिवसेनेने बजावाला व्हीप

शिंदे गटातील ४० आमदारांसह ५५ आमदारांना शिवसेनेने बजावाला व्हीप

Subscribe

या व्हिपविरोधात मतदान करणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांवर कारवाई होऊ शकते. दरम्यान, शिंदे गटाकडून भरत गोगावले मुख्य प्रतोद असल्याने ठाकरे गटाने बजावलेला व्हिप अधिकृत ठरेल का हे पाहावे लागणार आहे.

मूळ शिवसेना नक्की कोणाची यावरून सर्वोच्च न्यायालयात आणि निवडणूक आयोगाकडे सुनावणी प्रलंबित असताना पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला शिवसेनेने शिंदे गटाला धक्का दिला आहे. विधानसभेतील शिवसेनेच्या ५५ आमदारांना ठाकरेंनी व्हिप जारी केला आहे. शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी हा व्हिप जारी केला आहे. (On the eve of the session, Shinde group was shocked by Thackeray, whipped to 55 MLAs)

पावसाळी अधिवेशनात विविध शासकीय ठराव, प्रस्ताव सभागृहात मांडले जातील. या प्रस्तावांना मंजुरी मिळण्याकरता सभागृहात मतदान होण्याची शक्यता आहे. अशावेळी शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या बाजूने मतदान व्हावे याकरता सुनिल प्रभू यांनी व्हिप जारी केला आहे. यानुसार, या व्हिपविरोधात मतदान करणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांवर कारवाई होऊ शकते. दरम्यान, शिंदे गटाकडून भरत गोगावले मुख्य प्रतोद असल्याने ठाकरे गटाने बजावलेला व्हिप अधिकृत ठरेल का हे पाहावे लागणार आहे.

- Advertisement -

यासंदर्भात प्रतिक्रिया देताना राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, ‘आम्ही मूळ शिवसेना आहोत. विधानसभेत आणि लोकसभेत लोकप्रतिनिधींमध्ये आम्ही बहुमतात आहोत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय आम्हाला जो निर्णय देईल, तो आम्हाला मान्य असेल. सर्वोच्च न्यायालय आणि केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आमची बाजू भक्कमपणे मांडली आहे. त्यामुळे आमची कुठेही अडचण होणार नाही.’

राज्यात व्हिप वॉर

- Advertisement -

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर विशेष अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. या अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळीही शिवसेनेने व्हीप जारी केला होता. तसेच, शिंदे गटानेही व्हीप बजावला. मात्र, दोन्ही गटाने एकमेकांच्या व्हीपकडे दुर्लक्ष करून गटाच्या नेतृत्त्वालाच प्राधान्य दिलं होतं. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी पक्षात बंडखोरी केल्यापासून राज्याच्या राजकारणात व्हिप-वॉर पाहायला मिळत आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -