घरमहाराष्ट्रEknath Shinde : मनोज जरांगेंना अटक करण्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले, "संयमाचा अंत...

Eknath Shinde : मनोज जरांगेंना अटक करण्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले, “संयमाचा अंत पाहू नका”

Subscribe

मुंबई : देवेंद्र फडणवीस हे माझ्याविरोधात षडयंत्र रचत आहेत. मला सलाईनमधून विष देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असा गंभीर आरोप मराठ आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. एवढेच नाही तर मनोज जरांगे पाटील देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर येण्यासाठी निघाले आहेत. याचपार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला की, मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गंभीर आरोप केले आहेत, तर त्यांना अटक करणार का? या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, संयमाचा अंत पाहू नका. तसेच कायद्यापेक्षा कुणीही स्वत:ला मोठे समजू नये. त्यामुळे आता मराठा आंदोलन मनोज जरांगे यांना अटक होणार का? हे पाहावे लागेल. (On the question of arresting Manoj Jarange Chief Minister Eknath Shinde said Don’t see the end of patience)

हेही वाचा – NCP-SP : फडणवीसांची ताबडतोब चौकशी करावी; जरांगेंच्या आरोपानंतर शरद पवार गटाची मागणी

- Advertisement -

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती, तर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करणाऱ्या मनोज जरांगे यांच्यावर कारवाई होणार का? या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचा संयम सुटल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी म्हटले की, मराठा समाज संयमी आहे, पण त्याला गालबोट लावण्याचं काम जे कुणी करत असेल, त्यांच्यापासून मराठा तरुणांनी सावध राहायला हवं. त्यामुळे कोणीही आता संयमाचा अंत पाहू नये. जरांगे पाटलांची जोपर्यंत मराठा समाजासाठी प्रामाणिक भावना होती, तोपर्यंत सरकार त्याच्याबरोबर होतं. मी कधीही इगो ठेवला नाही. पण आताची त्यांची भाषा राजकीय वाटते आहे. त्यांच्याकडून कुणीतरी हे सगळं बोलून घेतं आहे, असा वास मला येतो आहे, असा दावा करत एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

हेही वाचा – Bacchu Kadu : एका व्यक्तीवरील आरोपाने आंदोलनाची दिशा…; बच्चू कडूंकडून जरांगेंना विनंती

- Advertisement -

मनोज जरांगेंच्या आरोपावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांबाबत खालच्या पातळीवर जाऊन बोलणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे. देवेंद्र फडणवीसांबाबत त्यांना आरोप करण्यासाठी कुणी सांगितलं आहे का? हे पाहायला हवं. असे खालच्या पातळीवरचे आरोप महाराष्ट्र सहन करत नाही. प्रत्येकाने आपापल्या मर्यादेत राहायला हवं. या प्रकारांमुळे समाजाला त्रास होता कामा नये. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होता कामा नये. कुणाला वाटत असेल की, सरकारला काही माहिती नाही, पण गृहविभाग यावर पूर्ण लक्ष ठेवून आहे. कायदा-सुव्यवस्था बिघडवण्यासाठी जे कुणी जबाबदार असतील, त्यांना सरकार पाठिशी घालणार नाही, असा इशाराही एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -