Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र महाराष्ट्रात पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात; 'या' 4 भागातील पावसाचे अपडेट्स

महाराष्ट्रात पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात; ‘या’ 4 भागातील पावसाचे अपडेट्स

Subscribe

राज्यातील कोणत्या भागात पावसामुळे नेमकी काय परिस्थिती आहे येऊ जाणून घेणार आहोत त्याचबरोबर खात्याकडून खात्याकडून पावसासंदर्भातील अंदाज सुद्धा वर्तविण्यात आला आहे. त्यानुसार मुंबईत आणि पुण्यासारख्या(mumbai - pune monsoon)  राज्यातील मोठ्या शहरांमध्ये आणि इतर जिल्ह्यांमधील पावसाच्या महत्वाच्या अपडेट्स जाणून घ्या.

मागील काही दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर कायम आहे. संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने(maharahstra monsoon) जोरदार बंटिंग सुरु केली आहे. पावसामुळे अनेक ठिकाण पूरपरिस्थिती सुद्धा निर्माण झाली आहे. तर काही भागांमध्ये अलर्ट सुद्धा जरी करण्यात आले आहेत. राज्यातील कोणत्या भागात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे त्याचबरोबर राज्यातील कोणत्या भागात पावसामुळे नेमकी काय परिस्थिती आहे येऊ जाणून घेणार आहोत त्याचबरोबर खात्याकडून खात्याकडून पावसासंदर्भातील अंदाज सुद्धा वर्तविण्यात आला आहे. त्यानुसार मुंबईत आणि पुण्यासारख्या(mumbai – pune monsoon)  राज्यातील मोठ्या शहरांमध्ये आणि इतर जिल्ह्यांमधील पावसाच्या महत्वाच्या अपडेट्स जाणून घ्या.

हे ही वाचा – Monsoon Update : कोकणात नैऋत्य मान्सूनची हजेरी, हवामान विभागाची माहिती

- Advertisement -

१) कोणत्या भागात कोणता अलर्ट

- Advertisement -

भारतीय हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार पुणे, जळगावसह विदर्भात पावसाचा येलो अलर्ट जरी करण्यात आला आहे. जळगावमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

२) मुंबई

हवामान खात्याने मुंबईत सुद्धा मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मुंबईत(mumbai)आणि उपनगरातील भागात पावसाची रिपरिप सुरु झाली आहे. दरम्यान या पावसाचा कोणत्याही प्रकारचा परिणाम मुंबईच्या जनजीवनावर झाला नाही. मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात हवामान खात्याकडून पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

हे ही वाचा – विनायक मेटेंचा घातपात? आयशर ट्रकने पाठलाग करत कट मारला होता, कार्यकर्त्याचा दावा

३) भंडाऱ्यात पूरपरिस्थिती

भंडारा(bhandara monsoon) जिल्ह्यात पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. भंडारा जिल्ह्यातील महत्वाची आणि जीवनदायी मानली जाणारी नदी वैनगंगा सुद्धा दुथडी भरून वाहते आहे. वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी ३ मीटरने वाढली आहे. यामुळे भंडारा शहराला पुराचा धिक अधीकच वाढला आहे. दरम्यान भंडारा जिल्ह्यातील टप्पा मोहल्ला, गणेश नगरी, ग्रामसेवक कॉलनी कपिल नगर या भागात पुराचे पाणी शिरत असल्याने तेथील नागरिकांना खबरदारीचा इशारा म्हणून जिल्हाप्रशासनाने विस्थापित केले आहे.

४) विदर्भात आणि गडचिरोलीत मुसळधार

मागील दोन दिवसांपासून गडचिरोलीत(gadchiroli monsoon) पावसाने धुव्वाधार बॅटिंग सुरु केली आहे. गडचिरोलीत झालेल्या  मुसळधार पावसाने तिथले नदी – नाले ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे तेथील २० मार्गांवरील वाहतूक सुद्धा विस्कळीत झाली आहे. पुराच्या फटक्यामुळे २०० नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले. तर विदर्भातIvidarbha monsoon)  सुद्धा मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

हे ही वाचा – विनायक मेटे यांचं निधन वेदनादायी; शरद पवारांकडून शोक

 

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -