घर क्राइम Appasaheb Dharmadhikari : 'त्या' बनावट पत्रप्रकरणी पुण्यातून एकाला अटक

Appasaheb Dharmadhikari : ‘त्या’ बनावट पत्रप्रकरणी पुण्यातून एकाला अटक

Subscribe

महाराष्ट्र भूषण डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावे बनावट पत्र सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले होते. याप्रकरणी पोलिसांना पुण्यातून एकाला अटक केल्याची माहिती समोर येत आहे. अटक केलेला संबंधित व्यक्ती 24 वर्षांचा आहे.

महाराष्ट्र भूषण डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावे बनावट पत्र सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले होते. याप्रकरणी पोलिसांना पुण्यातून एकाला अटक केल्याची माहिती समोर येत आहे. अटक केलेला संबंधित व्यक्ती 24 वर्षांचा आहे. मात्र त्याचे अद्याप अस्पष्ट आहे. (One Arrested From Pune In Appasaheb Dharmadhikari Fake Letter Viral On Social Media)

मिळालेल्या माहितीनुसार, रायगडच्या स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. अटकेनंतर संबंधित व्यक्तीला अलिबागच्या न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

- Advertisement -

नेमका वाद काय?

समाज प्रबोधनकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी खारघर येथील कार्यक्रमामध्ये उष्माघाताने मृत झालेल्या नातेवाईकांना सांत्वनपर पत्र १७ एप्रिलला लिहिले होते. त्या पत्राचा वापर निखालस खोट्या पत्रासाठी करण्यात आला होता. या प्रकरणात रायगड पोलिसांनी सोमवारी पुण्यातून एकाला अटक केली.

- Advertisement -

व्हायरल पत्रात काय?

या बनावट पत्रात राज्य सरकारच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले गेले होते. शासनाने दिलेला पुरस्कार परत करणार असल्याचेही नमूद करण्यात आले होते. तसेच, “माझ्या अनुयायांचा मतांसाठी वापर केला. माझ्या साधकांसाठी मंडप टाकला नाही. झालेल्या घटनेची पूर्ण जबाबदारी घेऊन मी श्री सेवकांची माफी मागतो. माझ्या सर्व श्री सेवकांना मी आवाहन करतो की यापुढे भाजप आणि शिंदे गटाला मतदान करू नका”, असे बनावट पत्रात नमूद करण्यात आले होते.

फेरफार करून हे पत्र तयार केले – खुलासा

समाजमाध्यमांवर हे पत्र प्रसारित झाल्यानंतर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे प्रवक्ते तथा आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे सचिव संदीप पाटील यांच्याकडे विचारणा करण्यात आली. त्यावेळी त्यांनी हे पत्र बनावट असल्याचे सांगितले. याशिवाय, कोणीतरी खोडसाळपणा करून यापूर्वी आप्पासाहेबांनी काढलेल्या पत्राचा वापर करून त्यातील मूळ मजकूर काढून त्यात, फेरफार करून हे पत्र तयार केले असल्याचे नमूद केले.


हेही वाचा – समाजमाध्यमांवर व्हायरल होत असलेले पत्र बनावट; आप्पासाहेब धर्माधिकारींकडून खुलासा

- Advertisment -