घरमहाराष्ट्रतोतया संपादकाने लावला ४ लाखांना चुना

तोतया संपादकाने लावला ४ लाखांना चुना

Subscribe

ऑनलाईन वेबसाईटवर कारचे फोटो टाकून केली एका डॉक्टरची फसवणूक, बारामतीत गुन्हा दाखल

महाराष्ट्र न्यूज चॅनेलचा संपादक असल्याची बतावणी करत तोतया पत्रकाराने एका डॉक्टरची फसवणूक केल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. या गुन्ह्यात वाहनाची मालक असलेली महिलादेखील सहभागी असल्याची तक्रार फसवणूक झालेल्या डॉक्टरने केली आहे. त्याच्या तक्रारीवरून बारामती पोलिसांनी दोघा संशयित आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार असलेल्या एका डॉक्टरला सेकंडहॅण्ड कार विकत घ्यायची होती. त्यांनी ओएलएक्सवर कारचा शोध सुरू केला. त्यात त्यांना बारामतीमध्ये राहणाऱ्या प्रियांका जाधव यांच्या नावावरील कार आवडल्याने त्यांनी संपर्क त्या जाहिरातीत दिलेल्या नंबरवर संपर्क साधला. हा नंबर संशयित आरोपी महेश कदम याचा होता. कदमने आपण एका चॅनेलचा संपादक असल्याचे सांगितले. त्यावर विश्वास ठेवत तक्रारदार बारामतीत गेला. त्यांनी गाडीची माहिती घेतली. कदमने गाडीची कागदपत्रे दाखवली. ट्रायलही दिली. त्यानंतर तक्रारदार डॉक्टर आणि कदम यांच्यात ५ लाखांचा व्यवहार ठरला. त्यातील ४ लाख रुपये डॉक्टरने त्याच दिवशी प्रियांका जाधव यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केले. तर, उर्वरित एक लाख रुपये सर्व कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर देण्याचे ठरले.

- Advertisement -

डॉक्टर आणि साक्षीदाराला गाडीत बसवत कदमने त्यांना बारामतीच्या नवीन प्रशासकीय भवनालगत असलेल्या झेरॉक्स सेंटरमध्ये नेले. नोटरीला सुरुवात होताच प्रियांका जाधवला सहीसाठी घेऊन येत असल्याचे सांगत कदम गाडी घेऊन फरार झाला. त्यामुळे प्रियांका जाधव व कदम यांनी संगनमताने ही फसवणूक केल्याची तक्रार डॉक्टरने दिली आहे. त्यावरून पोलिसांनी दोघा संशयित आरोपींना ताब्यात घेतले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -