CoronaVirus: ग्रीन झोनमध्ये असलेल्या जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव!

Ahmednagar district is included in the non-red zone area
Ahmednagar district is included in the non-red zone area

राज्यात कोरोना विषाणूचा फैलाव दिवसेंदिवस वाढत आहे. आता ग्रीन झोनमध्ये असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यात आज कोरोनाचा शिरकाव झाला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या परंडा तालुक्यातील सरणवाडी गावातील एक तरुण कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात ३८ दिवासानंतर कोरोनाचा रुग्ण आढळल्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

तरुणाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती सोमवारी माहिती जिल्ह्या शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांनी दिली आहे. एप्रिलच्या सुरुवातील उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे तीन रुग्ण आढळले होते. त्यातील उमरगा भागातीलच हे तीन रुग्ण आढळले होते. मात्र आता जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा कोरोना विषाणुचा शिरकाव सुरू झाला आहे. आजच जिल्ह्यातील लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आले होते. मात्र आता कोरोनाचा एक रुग्ण सापडल्याने प्रशासकीय पातळीवरही त्याचा परिणाम होणार असल्याचे सांगण्यात येऊ लागले आहे.

राज्यात कोरोनाबाधित आकडा २३ हजार ४०१ झाला आहे. त्यापैकी ८६८ जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच ४ हजार ७८६ जण हे रिकव्हर झाले आहेत. देशातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ७० हजारवर पोहोचला असून त्यापैकी २ हजार २९४ जणांचा मृत्यू झाला आहे.


हेही वाचा – CoronaVirus: अमेरिकन लोकांच्या मृत्यूला राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जबाबदार – नोम चॉम्स्की