घरमहाराष्ट्रआमदारांच्या स्थानिक विकास निधीत एक कोटींची वाढ

आमदारांच्या स्थानिक विकास निधीत एक कोटींची वाढ

Subscribe

आमदारांचा स्थानिक विकास निधी आता ३ कोटी

आमदारांच्या स्थानिक विकास निधीत एकर कोटींची वाढ करत आता हा निधी ३ कोटी इतका करण्यात
आला आहे. याबाबतचे आदेश महाराष्ट्र शासनाने काढले आहेत. २०११-१२ या आर्थिक वर्षापासून आमदरांना स्थानिक विकासाठी २ कोटी अवढा दिला जात होता. दरम्यान, शासनाच्या नव्या आदेशानुसार आता २०२०-२१ या आर्थिक वर्षापासून ३ कोटी एवढा निधी दिला जाणार आहे. बांधकाम आणि इतर साहित्याच्या दरांमध्ये भाववाढ आणि आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत यापूर्वी निर्माण करण्यात आलेल्या वास्तूंची देखभाल आणि दुरुस्तीसाठी लागणाऱ्या निधी विचारात घेत हा निर्णय घेण्यात आला आहे.

जिल्हा वार्षिक योजना राबविताना स्थानिक लोकांना उपयुक्त असलेली आणि सहजरित्या पूर्ण होणाऱ्या लहान कामांना आवश्यक असलेला निधी कमी प्रमाणात उपलब्ध होतो. या निधीमधून अनेक कामे करायची असतात. यामध्ये शाळखोल्या, शौचालये बांधकाम, बंधारे आदी लहान कामांचा समावेश आहे. दरम्यान, भाववाढ झाल्याने या कामांना देखील अधिकचा निधी लागतो. त्याच पार्श्वभूमीवर आता शासनाने आमदारांच्या निधीत १ कोटींची वाढ करत ३ कोटी एवढा निधी केला आहे.

- Advertisement -

आर्थिक वर्षे २०२०-२१ पासून उपलब्ध होणाऱ्या ३ कोटीच्या निधीमधून १० टक्के म्हणजेच ३०.०० लाख राखीव निधी ठेवला जाणार आहे. हा निधी आमदारा स्थिनक विकास कार्यक्रमांतर्गत यापूर्वी करण्यात आलेली कामे किंवा वास्तूंच्या देखभालीसाठी हा राखीव निधी वापरावा लागणार आहे. या राखीव निधीतून राज्य शासनाच्या इतर कार्यक्रम आणि योजनांतर्गत यापूर्वी करण्यात आलेली कामे आणि वास्तूंच्या अतिआवश्यक आणि तातडीची देखभाल व दुरुस्ती करण्याकरीता १०.०० लाख निधी ‘विशेष बाब’ म्हणून अनुमती दिली जाणार आहे.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -