नाशकात एक कोटीचा खाद्यतेलसाठा जप्त

नाशिक : अन्न औषध प्रशासनाने खाद्यतेलाच्या गोडावूनवर छापा टाकत मोठी कारवाई केली आहे. तालुक्यातील शिंदे गावात टाकलेल्या कारवाईत तब्बल एक कोटी १०लाख ११ हजारांचा साठा जप्त करण्यात आलाय. जप्त केलेलं तेल तपासणी करिता पाठवण्यात आले आहे.

अन्न व औषध औषध प्रशासनाकडून भेसळयुक्त पदार्थ विकणाऱ्यांच्या विरोधात विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार नाशिक तालुक्यातील शिंदे गावानजीकच्या शिंदे-नायगाव रस्त्यावरील माधुरी रिफायनर्स या कारखान्याच्या गोडावूनवर छापा टाकला आहे. सदर गोडावून मध्ये उच्च दर्जाचे भासवून भेसळयुक्त तेल विक्री करत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत तब्बल १ कोटी १०लाख ११हजार रुपयांचा तेलसाठा जप्त केलाय. दरम्यान जप्त केलेला साठा तापसणीकरता पाठवण्यात आलाय.