घरमहाराष्ट्रतलावांत गतवर्षीच्या तुलनेत एक लाख दशलक्ष लिटर कमी पाणीसाठा

तलावांत गतवर्षीच्या तुलनेत एक लाख दशलक्ष लिटर कमी पाणीसाठा

Subscribe

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांत सध्या अपेक्षित पाऊस पडत नाही. त्यामुळे पाणीसाठा घटत चालल्याने पालिकेने २७ जूनपासून १० टक्के पाणीकपात लागू केली आहे. त्यातच २९ जून २०२१ च्या तुलनेत रोजीच्या तुलनेत सध्या तलावांत १,०५,४५३ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा कमी असल्याची माहिती समोर येत आहे.

मुंबईला पाणीपुरवठा (Water Supply) करणाऱ्या सात तलावांत सध्या अपेक्षित पाऊस पडत नाही. त्यामुळे पाणीसाठा घटत चालल्याने पालिकेने (BMC) २७ जूनपासून १० टक्के पाणीकपात लागू केली आहे. त्यातच २९ जून २०२१ च्या तुलनेत रोजीच्या तुलनेत सध्या तलावांत १,०५,४५३ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा कमी असल्याची माहिती समोर येत आहे. जर पुढील आठवडाभरात अपेक्षित पाऊस पडून पाणीसाठ्यात वाढ न झाल्यास पाणीकपातीत आणखीन वाढ होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. (One lakh million liters less water storage in the lake than last year)

मुंबईला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार व तुळशी या सात तलावांमधून दररोज ३,८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. मुंबईला वर्षभरासाठी तलावांत १४, ४७,३६३ दशलक्ष लिटर इतक्या पाणीसाठ्याची आवश्यकता असते. मात्र यंदा गतवर्षीच्या तुलनेत कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे सध्या तलावांत १,४७,००६ दशलक्ष लिटर पाणीसाठा असून तो पुढील ४२ दिवस म्हणजे ९ ऑगस्ट २०२२ पर्यन्त पुरेल इतका आहे. तोपर्यंत तलावांत आवश्यक पाऊस पडणे आवश्यक आहे.

- Advertisement -

पावसाळ्यातील चार महिन्यातील एक जून महिना संपायला आला आहे. पुढील जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर या तीन महिन्यांत चांगला पाऊस पडणे आणि तलावांत पुढील वर्षभराचा पाणीसाठा जमा होणे आवश्यक आहे. तरच मुंबईला व मुंबई महापालिकेकडून १५० दशलक्ष लिटर इतका दैनंदिन पाणीपुरवठा भिवंडी व निजामपूर महापालिकेला वर्षभर पाणी कपातीचा फटका न बसता सुरळीत पाणीपुरवठा होऊ शकतो.

९ जून २०२१ रोजीपर्यन्त सात तलावांत २,५२,४५९ दशलक्ष लिटर (१७.४४ टक्के) इतका पाणीसाठा शिल्लक होता. तर यंदाच्या म्हणजे २९ जून २०२२ रोजीपर्यन्त सात तलावांत १,४७,००६ दशलक्ष लिटर (१०.१६ टक्के) इतका पाणीसाठा जमा झालेला आहे. मात्र तुलनात्मक गणित केल्यास गतवर्षीच्या तुलनेत सात तलावांत १,०५,४५३ दशलक्ष लिटर इतका म्हणजे ७.३० टक्के कमी पाणीसाठा आहे.

- Advertisement -

२९ जूनपर्यंत सात तलावातील पाऊस व पाणीसाठा

तलाव                   तलावात पडलेला            पाणीसाठा
एकूण पाऊस, मिमी        दशलक्ष लिटर

उच्च वैतरणा                 १३०.००                       ०

मोडकसागर                १८१.००                    ४५,७६०

तानसा                      २६२.००                    ८,५७८

मध्य वैतरणा                २४५.००                    १७,१२०

भातसा                      ४६९.००                    ६९,८२९

विहार                       २७४.००                    ३,६९१

तुळशी                       ३२६..००                   २,०२७

  • एकूण पाऊस  १,७८७ .००
  • एकूण पाणीसाठा  १,४७,००६

हेही वाचा – महाराष्ट्रात पुढील ४८ तासांत मुसळधार पावसाचा इशारा

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -