घरताज्या घडामोडीकरोना अपडेट - पिंपरी चिंचवडमध्ये अजून एकाला करोनाची लागण

करोना अपडेट – पिंपरी चिंचवडमध्ये अजून एकाला करोनाची लागण

Subscribe

राज्यात दिवसेंदिवस करोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये अजून करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. या रुग्णाने फिलीपिन्स, सिंगापूर आणि कोलंबो या ठिकाणांहून प्रवास केल्या समोर आलं आहे. तसंच हा करोनाग्रस्त रुग्ण २१ वर्षांचा आहे. यामुळे पिंपरी-चिंचवडमधील करोनाग्रस्तांची संख्या १० वरून ११ वर पोहचली आहे. तसंच पुण्यातील करोनाग्रस्तांचा आकडा १९वर पोहचला आहे. तर राज्यातील एकूण करोनाग्रस्तांचा आकडा ४५वर पोहचला आहे. त्यामुळे सध्या राज्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.

पुण्यात एकूण करोनाग्रस्तांची संख्या १९ झाली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील खासगी रुग्णालयात देखील आयसोलेशनची व्यवस्था केली आहे. तसंच नायडू आणि वायपीएम रुग्णालयात ६० आयसोलेटेड बेडसची व्यवस्था करण्यात आली आहे, असं आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. तसंच राज्यातील करोनाग्रस्तांची प्रकृती स्थिर असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

करोना व्हायरसची लक्षणे काय आहेत

  • सर्दी, खोकला
  • तीव्र ताप
  • श्वास घ्यायला त्रास होणे, श्वासास अडथळा
  • न्यूमोनिया, अतिसार, फुप्फुसात सूज
  • करोना व्हायरसमुळे सर्दी, खोकल्याची लक्षणे दिसून येतात. पण, जर गंभीर प्रकारचा त्रास होत असेल तर मृत्यू देखील ओढवू शकतो.
  • सामान्य सर्दीसारखी याची लक्षणे नाहीत, ज्यामुळे चिंता अधिक बळावू शकतो.
  • हे व्हायरस जीवांच्या एका प्रजातीतून दुसऱ्या प्रजातीत जातात आणि त्यानंतर मनुष्याला संक्रमित करतात. या दरम्यान, या व्हायरसचा अजिबात पत्ता लागत नाही. त्यामुळे, हा प्राण्यातूनच मनुष्यापर्यंत पोहोचला आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या नवीन व्हायरसच्या लक्षणांतून सर्वात जास्त फुप्फुसांवर परिणाम होत आहे.

हेही वाचा – Coronavirus: मुंबईत आढळला करोनाचा नवा रुग्ण

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -