घरताज्या घडामोडीपिंपरी-चिंचवडमध्ये सापडला आणखी एक करोना पॉझिटिव्ह रुग्ण

पिंपरी-चिंचवडमध्ये सापडला आणखी एक करोना पॉझिटिव्ह रुग्ण

Subscribe

पिंपरी-चिंचवडमध्ये आणखी एक करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळा असून सध्या त्या व्यक्तीवर उपचार सुरु आहेत.

पुण्याच्या पिंपरी – चिंचवडमध्ये आणखी एक करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. पुणे विभागात एका व्यक्तीचा अहवाल आज हाती आला असून हा रुग्ण पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले असून करोनाचे एकूण १६ रुग्ण झाले आहेत. त्यामुळे पुणेकरांनामध्ये भीतीचे वातावरण पसरले असून हा संसर्ग रोखण्यासाठी पुण्यात देखील संचारबंदी लागू करण्यात यावी असा प्रस्ताव मांडला आहे.

जपानहून आली होती व्यक्ती

करोना पॉझिटिव्ह अहवाल आलेली व्यक्ती ही पिंपरी – चिंचवड भागातील असून या व्यक्तीचे वय ३१ वर्ष आहे. तसेच ही व्यक्ती नुकतीच जपानला जाऊन असल्याची माहिती समोर आली आहे. या संशयित रुग्णाची १४ मार्चला चाचणी करण्यात आली होती. त्या चाचणीनुसार त्या संशयित रुग्णाचा अहवाल आला असून ही व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आली आहे. मुळे पुणे विभागातील एकूण रुग्णांची संख्या आता १६ वर पोहोचली आहे.

- Advertisement -


हेही वाचा – कोल्हापुरमध्ये दगावलेला रुग्ण करोनाग्रस्त नाही

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -