घरताज्या घडामोडीCoronavirus: पुण्यात आणखी एक पॉझिटिव्ह रुग्ण, आकडा ६४वर!

Coronavirus: पुण्यात आणखी एक पॉझिटिव्ह रुग्ण, आकडा ६४वर!

Subscribe

पुण्यातील एकूण करोनाग्रस्तांचा आकडा १० वरून ११ वर पोहोचला आहे. पुण्यात आढळले आणखी एक पॉझिटिव्ह रुग्णांने आयर्लंडवरून प्रवास केला आहे.

राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या दिवसभरात १२वर पोहोचली आहे. पुण्यात आणखी एक करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. त्यामुळे पुण्यातील करोनाग्रस्तांचा आकडा ११वर पोहोचला असून राज्यातील एकूण करोनाग्रस्तांचा आकडा रुग्ण ६४ झाला आहे. हा रुग्ण आयर्लंडवरून आला असल्याचं समोर आलं आहे. या करोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आलेल्या इतर लोकांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

एका दिवशी १२ पॉझिटिव्ह रुग्ण 

शनिवारी आढळलेल्या ६४ रुग्णांपैकी ८ रुग्ण मुंबई येथील तर २ जण पुणे येथील आहेत. प्रत्येकी १ रुग्ण यवतमाळ आणि कल्याण येथील आहेत. मुंबईत आढळलेल्या ८ रुग्णांपैकी ६ जणांचा परदेश प्रवासाचा इतिहास आहे. तर एक जण विमानतळावर काम करणारा कर्मचारी आहे. तसेच आणखी एक रुग्ण गुजरातमध्ये प्रवास केलेला आहे. यवतमाळ येथील असणारा पण मुंबईत भरती असलेल्या रुग्णाने कांगो देशाचा प्रवास केलेला आहे. कल्याण येथील करोनाग्रस्त रुग्ण हा दोन दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आढळलेल्या आणि दुबई प्रवासाचा इतिहास असलेल्या उल्हासनगर येथील तरुणीचा भाऊ आहे. तो स्वतः बहिणीसोबत दुबईला गेला होता. पुणे येथील २५ वर्षांच्या करोनाग्रस्त तरुणाने इंग्लंड आणि आयर्लंड येथे प्रवास केलेला आहे. दरम्यान कुठलाही परदेश प्रवासाचा इतिहास नसलेली एक ४१ वर्षांची पुण्यातील महिला करोना पॉझिटिव्ह आढळलेली आहे. हा रुग्ण पॉझिटिव्ह येण्यामागील कारणमीमांसा तिच्या साथरोगशास्त्रीय अन्वेषणानंतर स्पष्ट होईल.

- Advertisement -

मुंबई जगभरात करोना विषाणूने थैमान घातले आहे. मुंबई आणि महाराष्ट्रातही करोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. मुंबई आणि परिसरातील करोनाग्रस्त आणि संशयित रुग्णांची संख्या सतत वाढत आहे.

पाळीव प्राण्यातून संसर्ग होत नाही

करोना आजार होण्याच्या भीतीने अनेकांनी आपल्याकडील पाळीव प्राणी सोडून देण्यास सुरुवात केली आहे, अशा तक्रारी हेल्पलाईनवर दिल्या जात आहेत. पाळीव प्राण्यांपासून करोना संसर्ग झाल्याची कोणतीही उदाहरणे नाहीत. त्यामुळे लोकांनी घाबरुन आपले पाळीव प्राणी सोडून देऊ नयेत, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

- Advertisement -

राज्यात आज एकूण २७५ परदेशातून आलेले प्रवासी सर्वेक्षणाखाली दाखल झाले आहेत. राज्यात आजपर्यंत बाधित भागातून एकूण १८६१ प्रवासी आले आहेत. १८ जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत १५९२ जणांना भरती करण्यात आले आहे. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी १२०८ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ६४ जण पॉझिटिव्ह आले आहेत.

जिल्हा / मनपा – करोनाग्रस्त रुग्ण – मृत्यू
पिंपरी चिंचवड मनपा – १२ – ०
पुणे मनपा – ११ – ०
मुंबई – १९ – १
नागपूर, यवतमाळ, कल्याण – प्रत्येकी ४ – ०
नवी मुंबई – ३ – ०
अहमदनगर – २ – ०
पनवेल, ठाणे, उल्हासनगर, औरंगाबाद, रत्नागिरी – प्रत्येकी १ – ०
एकूण – ६४ – १


हेही वाचा – Coronavirus: २४ तासांत देशभरात ९८ करोनाग्रस्त वाढले


!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -