घरमहाराष्ट्रकोल्हापूर महापालिकेतील प्रभाग आरक्षणावरची एकमेव हरकत निकाली, 92 पैकी 46 जागा महिलांसाठी...

कोल्हापूर महापालिकेतील प्रभाग आरक्षणावरची एकमेव हरकत निकाली, 92 पैकी 46 जागा महिलांसाठी राखीव

Subscribe

महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी 31 मार्चला काढण्यात आलेल्या आरक्षणावर शिक्कामोर्तब झाले आहे. या आरक्षणावर आलेली एकमेव हकरत पालिका प्रशासनाने निकालात काढली आहे. निश्चित झालेल्या आरक्षणानुसार92 पैकी 46 जागा महिलासाठी रखीव आहेत. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 12, तर अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी 1आणि सर्वराधारण प्रवर्गासाठी 79 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

प्रथमच तीन सदस्य पद्धतीने प्रभाग रचना –

- Advertisement -

कोल्हापूर महापालिका निवडणूक प्रमथच तीन सदस्य पद्धतीने होत आहे. कोल्हापूर शहरातील 31 प्रभागातील 92 नगसेवकांसाठी 31 मे रोजी आरक्षम सोडत जाहीर करण्यात आली. यावर 6 जूनपर्यंत हरकत घेण्याची मुदत होती. या काळावधीमध्ये एकच हरकत दाखल झाली होती. अनुसूचित जातीची लोकसंख्या असलेल्या प्रभागातील तिन्ही जागा अनुसूचितजाती साठी आरक्षित करण्यासाठी हरकत दाखल करण्यात आली होती. मात्र, नियमाने असे होत नसल्याने हरकत निकाली निघाली.

अनुसूचित जाती (महिला) –

- Advertisement -

प्रभाग क्रमांक – 7 अ, 4 अ, 9 अ,13 अ, 28 अ, 30 अ,

अनुसूचित जाती प्रभाग –

प्रभाग क्रमांक – 15 अ, 19 अ, 21 अ, 5 अ , 1 अ, 18 अ

सर्वसाधारण साधारण महिला –

प्रभाग क्रमांक – 1 ब, 2 ब, 3 अ, 4 ब, 5 ब , 6 अ, 6 ब, 7 ब, 8 अ, 8 ब, 9 ब, 10 अ, 11 अ, 11 ब, 12 अ, 13 ब, 14 अ, 15 ब, 16 अ, 16 ब, 17 अ, 18 ब, 19 ब, 20 अ, 21 ब, 22 अ, 22 ब, 23 अ, 24 अ, 24 ब, 25 अ, 25 ब, 26 अ, 27 अ, 27 ब, 28 ब, 29 अ, 30 ब, 31 अ

अनुसूचित जमाती –

प्रभाग क्रमांक – 2 अ

सर्वसाधारण प्रभाग –

प्रभाग क्रमांक – 1 क, 2 क, 3 ब, 3 क, 4 क, 5 क, 6 क, 7 क, 8 क, 9 क, 10 ब, 10 क, 11 क, 12 ब, 12 क, 13 क, 14 क, 15 क, 16 क, 17 क, 18 क, 19 क, 20 क, 21 क, 22 क, 23 क, 24 क, 25 क, 26 क, 27 क, 28 क, 29 क, 30 क, 31 ब

 

कोल्हापूर जिल्ह्यातील 9 नगरपालिकांच्या आरक्षण सोडत –

कोल्हापूर जिल्ह्यातील 9 नगरपालिकांसाठी प्रभाग आरक्षण निश्चित झाले आहे. सोमवारी त्या त्या ठिकाणी प्रभाग आरक्षण सोडती काढण्यात आल्या. या आरक्षण सोडतीनंतर 9 नगरपालिकांमधील 235 जागांपैकी 138 जागांवर महिलासाठी राखीव झाल्या आहेत . प्रभाग आरक्षण निश्चित करण्यात आलेल्या नगरपालिकांमध्ये इचलकरंजी, मुरगुड, गडहिंग्लज, जयसिंगपूर, कुरुंदवाड, पेठवडगाव, मलकापूर, पन्हाळा, कागल समावेश आहे.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -