घरठाणेठाणे शहरात गोवरमुळे एकाचा मृत्यू

ठाणे शहरात गोवरमुळे एकाचा मृत्यू

Subscribe

साडेसहा वर्षाची मुलगी दगावली

ठाणे : भिवंडी पाठोपाठ ठाणे शहरात गोवर या आजाराने साडेसहा वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली. त्या मुलीने लस घेतलेली नसल्याचेही महापालिका सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. गोवरमुळे मृत्यू होण्याची ही शहरातील पहिली घटना आहे.

राज्यात दिवसेंदिवस गोवर या आजाराचे रुग्ण वाढत आहेत. त्यातच मुंबई आणि भिवंडीत या आजाराने रुग्णांचा मृत्यू झाला असताना, आता ठाणे शहरात या आजाराने मृत्यू झाल्याची बाब पुढे आली आहे. त्यातच, मध्यंतरी गोवर रुग्ण वाढल्याचे समोर आल्यावर घरोघरी जाऊन सर्वेक्षण सुरू करून रुग्णांचा शोध घेतला जात आहे. तर, सोमवारी एका पथकाला शीळ भागात एका साडे सहा वर्षाच्या मुलीमध्ये गोवरची लक्षणे दिसून आली.

- Advertisement -

सुरुवातीला त्या मुलीला शीळ आरोग्य केंद्रात नेले. परंतु तिची प्रकृती ठीक नसल्यामुळे तातडीने तिला कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तर, मंगळवारी तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर त्या संदर्भात केलेल्या तपासणीचा अहवाल गुरुवारी आल्यावर तिचा मृत्यू गोवरमुळे झाल्याचे स्पष्ट झाले. तसेच त्या मुलीने गोवरची लस घेतलेली नसल्याची बाबही समोर आली आहे. याबाबत ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी दुजोरा दिला आहे.

गोवर रूबेला आजारासंबंधी सतर्क रहा- आयुक्त म्हसाळ
निजामपूर शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रात गोवर रूबेला आजाराचे 455 संशयित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये 121 रुग्णांचे रक्ताचे नमुने घेऊन तपासणी करता हापकिन रिसर्च इन्स्टिट्यूट, परेल, मुंबई येथे पाठविण्यात आले. त्यापैकी 45 रूग्ण हे गोवर रूबेला बाधित असल्याचे अहवाल प्राप्त झालेला आहे. हा अहवाल अंतर्गत 13 रुग्णांचे गोवर रूबेला लसीकरण झालेले आहे.तसेच इतर रुग्णांचे गोवर रूबेला लसीकरण झालेले नाही. या अहवाला अंतर्गत 03 गोवर बाधित रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. त्यापैकी पहिला मृत्यू न्यू आझाद नगर, कादरिया मज्जित, गायत्री नगर या क्षेत्रातील असून मृत्यू पावलेल्या बालकाचे वय 06 महिने आहे. दुसरा मृत्यू सलामत पुरा, नदी नाका या क्षेत्रातील असून मृत्यू पावलेल्या बालकाचे वय 14 महिने आहे. तिसरा मृत्यू इस्लामपुरा, मिल्लत नगर या क्षेत्रातील असून मृत पावलेल्या बालकाचे वय 08 महिने आहे.

- Advertisement -

सदर रुग्ण बाधित कार्यक्षेत्रामध्ये आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून संशयित रुग्णांना विटामिन ए चा पहिला डोस व 24 तासानंतर दुसरा डोस दिला जात आहे. तसेच 9 महिने ते 5 वर्षे वयोगटातील ज्या लाभार्थ्यांनी गोवर रूबेलाचा डोस घेतला नाही अशा लाभार्थ्यांना गोवर रूबेला दिला जात आहे. भिवंडी कार्यक्षेत्रात 240 टीम गोवर रूबेला सर्वेक्षणासाठी आयोजित करण्यात आलेले आहेत. तसेच भिवंडी शहरात दिनांक 24 नोव्हेंबर 2022 रोजी रईस हायस्कूल मधील मुलांद्वारे जनजागृती करणे करिता रॅली काढण्यात आली.

तसेच दिनांक 25 नोव्हेंबर 2022 रोजी गोवर रूबेला आजाराचे वाढते रुग्ण लक्षात घेता गोवर रूबेला आजार संबंधित मस्जितद्वारे धर्मगुरू (मौलाना) यांचे मार्फत गोवर आजार संदर्भात जनजागृती करणे करिता आवाहन करण्यात येणार असल्याबाबतची माहिती प्रशासक तथा आयुक्तांनी दिली. ताप आणि अंगावर पुरळ असलेला एखादा रुग्ण आढळल्यास त्वरीत जवळच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राशी व आपल्या कार्यक्षेत्रातील ए.एन.एम. व अशा स्वयंसेविका यांच्याशी संपर्क साधावा. तसेच आपल्या 5 वर्षाखालील बालकांचे एम. आर .चा पहिला व दुसरा लसीकरण डोस पूर्ण झालेला नसेल तर जवळच्या नागरिक आरोग्य केंद्र येथे जाऊन लसीकरण डोस पूर्ण करून घेण्याचे आवाहन महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी नागरिकांना केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -