घरताज्या घडामोडीमी शरद पवार बोलतोय... सिल्व्हर ओकवरून मंत्रालयात आलेल्या कॉलमुळे खळबळ

मी शरद पवार बोलतोय… सिल्व्हर ओकवरून मंत्रालयात आलेल्या कॉलमुळे खळबळ

Subscribe

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावे मंत्रालयात बुधवारी रात्री एक फोन आला. शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवरून हा फोन केला आहे अशी माहिती फोन करणाऱ्या व्यक्तीने दिली. शरद पवारांचा आवाज काढत या व्यक्तीने मंत्रालयात कॉल केला होता. त्यामुळे काही काळासाठी मंत्रालयात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे मंत्रालयातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही या प्रकरणात शोधाशोध करत थेट सिल्व्हर ओकपर्यंत पडताळणीसाठी कॉल करण्याची वेळ आली.

पण या कॉलची पडताळणी करण्यासाठी मंत्रालयातून सिल्व्हर ओकमध्ये फोन करण्यात आला. त्यानंतर हा फोन कॉल सिल्व्हर ओकमधून नसल्याचे स्पष्ट झाले. मंत्रालयातून या कॉलचा शोध घेण्यासाठी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यानुसार पोलिस शिपायाने गावदेवी पोलिस गाठत घडलेला प्रकार सांगितला. त्यामुळे या खोट्या कॉलच्या प्रकरणात गांवदेवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या फोनच्या प्रकरणात खंडणविरोधी पथकाने एकाला पुण्यातील जेऊर येथून ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात गावदेवी पोलिसांकडून आणखी शोध सुरू आहे. पण हा फोन नेमक्या कोणत्या कारणासाठी आणि काय उद्देशासाठी केला आहे याबाबतची माहिती अद्याप स्पष्ट होऊ शकली नाही.

- Advertisement -

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे दक्षिण मुंबई सिल्हर ओक येथे निवासस्थान आहे. याठिकाणाचा उल्लेख करत एका व्यक्तीने मंत्रालयात कॉल केल्याची माहिती आहे. महत्वाचे म्हणजे कॉल करताना आपण सिल्व्हर ओकवरून बोलत आहोत अशी ओळख या व्यक्तीने सांगितली. या व्यक्तीने शरद पवारांचा यांचा हुबेहूब आवाजही काढला. त्यामुळेच या प्रकरणात पोलिसांनी तातडीने शोध सुरू केला आहे. या फोनच्या प्रकरणात मुंबईच्या गावदेवी पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाशी संबंधितच खंडणविरोधी पथकाने तपास सुरू करत एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.

राज्यात फोन टॅपिंगचे प्रकरण गाजत असतानाच आता शरद पवार यांच्या निवासस्थानावरून कॉल करत असल्याचे सांगत या व्यक्तीने कॉल केला. त्यामुळे थोड्या वेळासाठी गोंधळ निर्माण झाला. शरद पवारांच्या आवाजात त्या व्यक्तीने नेमकी काय मागणी केली याची माहिती मात्र अद्यापही मिळू शकलेली नाही. या प्रकरणातील कारवाई म्हणून खंडणविरोधी पथकाने एका व्यक्तीला ठाण्यातील येऊर येथून ताब्यात घेतले आहे. प्रशासकीय बदल्यांसाठी हा कॉल गेला असावा अशीही माहिती मिळत आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -