अल्पवयीन मुलीला पाजले विष, बीडमधील घटना

One-sided love poisoned the minor girl
अल्पवयीन मुलीला पाजले विष, बीडमधील घटना

एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने विष पाजल्याची घटना बीडमध्ये घडली आहे. ऊसतोड कामगाराच्या 16 वर्षीय मुलीला, माझ्याशी लग्न कर असे म्हणत गावगुंडाने विष पाजले. यावेळी कुटुंबातील व्यक्तींनी सतर्कता दाखवत, गावगुंडाच्या तावडीतून मुलीला सोडवले. पिडीत मुलीला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मुलीने दिली होती दहावीची परीक्षा –

या मुलीने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती. ती आई-वडील ऊस तोडणीसाठी कारखान्यात गेल्यानंतर चुलत्याकडे राहत होती. ही संधी साधून 25 वर्षीय गावगुंड तरुण तिची छेड काढत असे. दोन वर्षांपासून तो सतत तीची छेड काढत होता. तो माझ्याशी लग्न कर म्हणत धमक्या देत होता.

शाळेत जाताना गावगुंड अडवत असे रस्ता –

शाळेत जाताना तो गावगुंड तरून तिचा रस्त अडवत असे. तो काल (मंगळवारी) पीडितेच्या घरी गेला. माझ्यासोबत लग्न कर , असे म्हणत त्याने थेट तीला विष पाजले. यावेळी कुटुंबातील व्यक्तींनी सतर्कता दाखवत गावगुंडाच्या तावडीतून मुलीला सोडवले. तील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तलवाडा पोलीसांकडून पीडितेचा जबाब नोदवण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू आहे.