घरताज्या घडामोडीमजुरी, रेशन नसल्यामुळे संतापलेले १५०० मजूर उतरले रस्त्यावर

मजुरी, रेशन नसल्यामुळे संतापलेले १५०० मजूर उतरले रस्त्यावर

Subscribe

संतापलेल्या मजुरांनी चंद्रपूर-हैदाराबाद महामार्ग रोखण्याचा प्रयत्न केला.

देशात कोरोनाच्या वाढत्या फैलाव लक्षात घेता लॉकडाऊन वाढण्यात आला आहे. ४ मे पासून १७ मेपर्यंत देशात लॉकडाऊन असणार आहे. यादरम्यान केंद्राने मजुरांना दिलासा दिला आहे. आपापल्या गावी जाण्यासाठी मजुरांना परवानगी देण्यात आली आहे. यामुळे अनेक मजूर मोठ्या प्रमाणात बाहेर येऊ लागले आहेत. दरम्यान चंद्रपूरमधील दीड हजार मजूर गावाला जाण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी महामार्गावर ठिय्या मांडला असल्याचे दिसून येत आहे. हे सर्व मजूर उत्तर प्रदेश, बिहार बंगालहून आले असून ते चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यायच्या इमारतीचं बांधकाम करतात. मात्र लॉकडाऊनमुळे हे काम बंद झालेले आहे. त्यांना आता कोणतीही मजुरी नाही, रेशन दिले जात नाही. यामुळे संतापलेल्या या मजुरांनी काही काळासाठी महामार्गावर ठिय्या मांडला. मजुरी नाही, रेशन नाही त्यामुळे आम्हाला गावाला जाऊ द्या अशी त्यांनी मागणी केली.

काल मजुरांसाठी तेलंगणातून झारखंडकडे पहिली रेल्वे रवाना करण्यात आली. चंद्रपुरात ही रेल्वे गेली, मात्र त्यावेळी चंद्रपुरातील मजुरांना यामध्ये प्रवेश दिला नाही. तसंच चंद्रपूर जिल्ह्यातील महत्त्वाचे रेल्वे स्थानक असलेल्या बल्लापूर येथून मजूर स्पेशल रेल्वे गाडी बिहार, झारखंडच्या दिशेने रवाना होण्याच्या १२ तासांच्या आताच त्याचे वेगळे परिणाम दिसू लागले आहेत. या रेल्वे स्थानपासून काही किलोमीटर असलेल्या चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यायच्या इमारतीचं बांधकाम करणाऱ्या कामगारांनी अचानक महामार्गावर येऊ आंदोलन करू लागले. यावेळी कोणत्याही प्रकारे सोशल डिस्टन्सिंग पालन केले नव्हते.

- Advertisement -

या इमारतीच्या बांधकामाचे कंत्राट बांधकाम कंपनी शापूरजी पालनजी यांच्याकडे आहे. लॉकडाऊनमुळे इथले बांधकाम दीड महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे इथले मजूर मजुरी मिळत नसल्याने संतापले आहेत. कंपनी रेशन देण्याचे आश्वासन दिले होत मात्र ते देखील अदा केले जात नाही आहे. त्यामुळे अजून संतापात भर पडली आहे. यामुळे चंद्रपूर-हैदराबाद महामार्गावर सुमारे दीड हजार मजूर रस्तावर उतरले आणि महामार्ग रोखण्याचा प्रयत्न केला.


हेही वाचा – CoronaVirus: मातोश्री बाहेरील तीन पोलिसांना कोरोनाची लागण!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -