घरताज्या घडामोडीCoronavirus: राज्यातील कोरोनाला एक वर्ष पूर्ण; सध्याची काय आहे परिस्थिती?

Coronavirus: राज्यातील कोरोनाला एक वर्ष पूर्ण; सध्याची काय आहे परिस्थिती?

Subscribe

अजूनही महाराष्ट्र देशातील कोरोना यादीत पहिल्या क्रमाकांवर

राज्यात कोरोना नियंत्रित होत असताना पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलं आहे. त्यामुळे कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. आज राज्यात कोरोनाचा शिरकाव होऊन एक वर्ष पूर्ण झालं आहे. राज्यात कोरोनाचा पहिला रुग्ण पुण्यात आढळला होता. दुबईहून पुण्यात आलेल्या एका व्यक्तीला कोरोना झाल्याचे ९ मार्चला समजलं होत. त्यानंतर राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढू लागला आहे.

९ मार्च २०२० रोजी राज्यात पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाची नोंद झाली होती. त्यानंतर त्या व्यक्तीच्या कुटुंबातील पत्नी आणि मुलीला देखील कोरोनाची लागण झाली होती. हे दाम्पत्य ४ फेब्रुवारीला दुबईला फिरायला गेलं होतं. यांच्यासोबत त्यांचा मुलगा नव्हता. २९ फेब्रुवारीला हे दाम्पत्य आपल्या मुलीसह पुण्यात परतलं. १ मार्च दाम्पत्यातील एका व्यक्तीला थोडेसे बरे वाटत नव्हते. त्यामुळे तो डॉक्टरकडे गेला. तेव्हा डॉक्टरांनी औषध देऊन आराम करण्यास सांगितलं. पुढेच तीन दिवस हा व्यक्ती घरी आराम करत होता. पण बरे वाटल्यानंतर हा व्यक्ती ५ मार्चला ऑफिसला गेला. दुसऱ्या दिवशी पुन्हा ताप आला. तेव्हा डॉक्टरांनी पुन्हा ताप येणं, ही चांगली गोष्टी नसल्याचं सांगितलं. दुबईहून आल्यामुळे डॉक्टरांनी कोरोना चाचणी करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे या व्यक्तीने कोरोना चाचणी केली आणि त्यानंतर ९ मार्च हा व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्यानंतर कळालं. राज्यात पहिल्या कोरोनाबाधित व्यक्तीच्या मृत्यू १७ मार्च २०२० रोजी नोंद झाली. कोरोना काळाच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत महाराष्ट्र देशातील कोरोना यादीत पहिल्या क्रमाकांवर आहे.

- Advertisement -

सध्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून ११ हजारांहून नव्या कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्र लॉकडाऊनच्या दिशेने जातोय का? अशी चिंता व्यक्त केली जात आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये सध्या लॉकडाऊन, संचारबंदी आणि कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढताना दिसत आहे. राज्यात काल ११ हजार १४१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून ३८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ६ हजार १३रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या २२ लाख १९ हजार ७२७वर पोहोचली आहे. यापैकी आतपर्यंत ५२ हजार ४७८ जणांचा मृत्यू झाला असून २० लाख ६८ हजार ४४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.


हेही वाचा – आठवलेंनी सांगितले राज ठाकरे मास्क न लावण्याचे कारण

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -