घरमहाराष्ट्रमुंबईत गोवरमुळे एका वर्षाच्या बाळाचा मृत्यू; कस्तुरबा रुग्णालयात संशयित रुग्णही वाढले

मुंबईत गोवरमुळे एका वर्षाच्या बाळाचा मृत्यू; कस्तुरबा रुग्णालयात संशयित रुग्णही वाढले

Subscribe

गोवर हा आजार Paramyxovirus च्या संसर्गामुळे होतो. या विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर साधारण 10 ते 12 दिवसात गोवरची लक्षणे दिसू लागतात. तसेच गोवर आजार झालेल्या व्यक्तींच्या संपर्कांत जी व्यक्ती येईल तिला सुद्धा हा आजार होण्याची भीती असते.

मुंबई – गोवरच्या आजाराने आज एका एक वर्षाच्या बाळाचा मृत्यू झाला आहे. कस्तुरबा रुग्णालयात उपचार घेत असताना या बाळाचा मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत गोवरमुळे मृत झालेल्या रुग्णांची संख्या ४ वर पोहोचली आहे.

गेल्या काही दिवासंत गोवरच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. पुरळ आणि ताप अशी गोवर सदृश्य लक्षणे असलेली ६ रुग्ण ऑक्सिजनवर ठेवण्यात आली आहेत. तर, वर्षभरात १२६ बालकांचे निदान झाले आहे. दरम्यान, आज एका बालकाचा मृत्यू झाला.

- Advertisement -

मुंबईतील नळ बाजारात राहणाऱ्या एक वर्षाच्या मुलाला गोवरची लागणी झाली. या मुलाला कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असताना या मुलाचा मृत्यू झाला असल्याची माहिती महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा – मुंबईत गोवरची रुग्णसंख्या वाढली; केंद्रीय पथक करणार पाहणी

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील गोवंडी परिसरात आतापर्यंत सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे महापालिकेने विशेष लसीकरण मोहीम सुरु केली आहे. 9 महिन्यांचे बालक आणि 16 महिन्यांच्या बालकांना गोवर प्रतिबंधक लस दिली जाते आहे. मुंबईतील वाढत्या गोवर रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून उच्चस्तरीय समिती गठित करण्यात आली होती. या समितीकडून मुंबईतील अनेक विभागात ठिकठिकाणी आढावा घेतला जात आहे.

हेही वाचा – मुंबईतील गोवरच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ; 740 संशयित

मुंबईत गोवरचे एकूण 740 संशयित रुग्ण असल्याची माहिती समोर येत आहे. या 740 रुग्णांमधील 50 रुग्णांना मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मुंबईतील 12 विभागात गोवरची रुग्णसंख्या मोठ्या संख्येने वाढत आहे.

मुंबई महापालिकेकडून उपाययोजना

मुंबईत गोवर आजाराचा वाढता धोका लक्षात घेऊन मुंबई महापालिकेकडूनही उपाययोजना करण्यात येत आहेत. याच सोबत विविध ठिकाणी आरोग्य शिबीर यांच्यासोबत पाहणी आणि लसीकरण करण्यास सुरुवात केली आहे. सामाजिक संघटना सुद्धा गोवरचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनजागृती करत आहेत. योग्य आहारासोबतच स्वछता राखत लहान मुलांसाठी असलेले लसीकरण करण्याचे आवाहन मुंबई महापालिकेकडून करण्यात येत आहे.

हेही वाचा – ‘गोवरमुक्त मुंबई’साठी पालिका सरसावली, लसीकरणातून साधणार लक्ष्य

गोवर आजाराची कारणे
गोवर हा आजार Paramyxovirus च्या संसर्गामुळे होतो. या विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर साधारण 10 ते 12 दिवसात गोवरची लक्षणे दिसू लागतात. तसेच गोवर आजार झालेल्या व्यक्तींच्या संपर्कांत जी व्यक्ती येईल तिला सुद्धा हा आजार होण्याची भीती असते.

गोवर आजाराची लक्षणे
खोकला, ताप, सर्दी, डोळ्यांची जळजळ, डोळे लाल होणे, घसा दुखणे, तोंडाच्या आतील बाजूला पांढऱ्या रंगाचे स्पॉट येणे, अंग दुखणे ही लक्षणे सुरुवातीच्या काळात जाणवतात. त्यानंतर पाच ते सात दिवसांनी चेहऱ्यावर, पोटावर आणि पाठीवर लालसर बारीक पुरळ उठतात.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -