घरCORONA UPDATEसुप्रियाताईंच्या पाठपुराव्याने १ महिन्यानंतर एका वर्षाचे बाळ आईच्या कुशीत विसावले

सुप्रियाताईंच्या पाठपुराव्याने १ महिन्यानंतर एका वर्षाचे बाळ आईच्या कुशीत विसावले

Subscribe

खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्यानंतर एक महिन्याने एक वर्षाचे बाळ आपल्या आईच्या कुशीत विसावले.

पुण्यातील मगरपट्टा परिसरात स्थायिक असलेले संगणक अभियंते पुनम आणि सचिन फुसे यांचा ११ महिन्यांचा मुलगा २० मार्चपासून मावळ येथे पुनम यांच्या आई- वडिलांकडे होता. दरम्याच्या काळात लॉकडाऊन लागू झाला. तो १४ एप्रिलपर्यंत उठेल, असा फुसे दांपत्याचा अंदाज होता. परंतु, तो ३ मे पर्यंत वाढला. त्यामुळे फुसे कुटुंब अस्वस्थ झाले. आपल्या बाळाला भेटण्यासाठाची पुनम यांची धडपड सुरू झाली. बाळदेखील आईच्या आठवणीने सारखे रडत होते. त्यामुळे आजी- आजोबांसह फुसे दांपत्य अस्वस्थ होते. सारखे रडत असल्यामुळे बाळाची तब्येतही खराब होत होती. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी पूनम यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्र प्रभारी मनाली भिलारे यांच्यामार्फत संपर्क साधला आणि अखेर एक महिन्यानंतर १ वर्षाचे बाळ आईच्या कुशीत विसावले.

सुप्रिया सुळेंमुळे एक वर्षाचे बाळ पोहोचले आईच्या कुशीत

गावाला आजी-आजोबांकडे अडकलेल्या आपल्या एक वर्षाच्या बाळाला भेटण्यासाठी आईचा जीव कासाविस होत होता. मात्र लॉकडाऊनने आई आणि बाळाची ताटातूट केली. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नामुळे हे बाळ पुन्हा आपल्या आईच्या कुशीत विसावले आहे.

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಬುಧವಾರ, ಏಪ್ರಿಲ್ 22, 2020

- Advertisement -

अखेर माय-लेकराची झाली भेट

या घटनेचे गांभीर्य ओळखून खासदार सुळे यांनी गृहखात्याशी संवाद साधला आणि पुनम यांना डिजिटल पास मिळण्यासाठी प्रयत्न केला. शहराची हद्द ओलांडली जाणार होती. सध्या शहरांच्या सीमा सील केल्या असल्यामुळे डिजिटल पास मिळणे जिकिरीचे होते. परंतु, सुळे यांनी हा प्रकार गृह खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना समजवून सांगितला. त्यानंतर राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अदिती नलावडे यांनी गृहखात्यात अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांकडे सुप्रियाताई यांच्या सूचनेनुसार पाठपुरावा केला. अखेर फुसे दांपत्याला २० एप्रिल रोजी पोलिसांकडून डिजिटल पास मिळाला. त्यानुसार त्या दांपत्याने २१ एप्रिल रोजी प्रवास करून बाळाला ताब्यात घेतले. योगायोगाने त्या बाळाचा पहिला वाढदिवस २१ एप्रिल रोजीच होता. बाळाने आईला पाहताच आणि आईने बाळाला पाहताच, परस्परांच्या भावनांना वेग करून दिला. दोघेही रडू लागले. त्यानंतर फुसे दांपत्य सायंकाळी पुण्यात घरी सुखरूप पोचले.

आम्हाला गरज होती, तेव्हा सुप्रियाताईं अक्षरशः देवासारख्या धाऊन आल्या. त्यांच्या मदतीमुळेच आमचे बाळ आमच्या ताब्यात आले. सुप्रियाताई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेली मदत आम्ही कधीच विसरणार नाही.   – पूनम फुसे, आई

- Advertisement -

हेही वाचा – LockDown : वायू प्रदूषण कमी करण्यासाठी ‘वर्क फ्रॉम होम’ गरजेचे!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -