घरदेश-विदेशOnion Export Ban : कांद्यावरील निर्यातबंदी केंद्र सरकारने उठवावी; शिंदे गटाची केंद्रीय...

Onion Export Ban : कांद्यावरील निर्यातबंदी केंद्र सरकारने उठवावी; शिंदे गटाची केंद्रीय उद्योगमंत्र्यांकडे मागणी 

Subscribe

नवी दिल्ली : कांद्याच्या निर्यातीवर केंद्र सरकारने 31 मार्च 2024 पर्यंत लावलेली निर्यातबंदी त्वरित उठवावी, अशी लेखी मागणी शिवसेना लोकसभा गटनेते खासदार राहुल शेवाळे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. केंद्रीय उद्योगमंत्री पीयूष गोयल यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन या मागणी संदर्भात खासदार राहुल शेवाळे यांनी निवेदन सादर केले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेच्या संसदीय दलाच्यावतीने ही मागणी करत असल्याचे या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. (Onion Export Ban The central government should lift the export ban on onion Shinde Group Rahul Shewale demand to the Union Industries Minister Piyush Goyal)

हेही वाचा – NCP Crisis : आयोगासमोरील सुनावणी पूर्ण; राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्हावर निर्णय कधी येणार?

- Advertisement -

खासदार राहुल शेवाळे यांनी आपल्या पत्रात म्हटले की, केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातबंदीचा निर्णय घेतल्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. या निर्णया विरोधात काही ठिकाणी शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. आधीच अवकाळी पावसाने राज्यातील शेतकरी त्रस्त आहे. तसेच बंदी त्वरित उठवली गेली नाही तर शेतकऱ्यांकडील कांदा खराब होईल आणि त्यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल. वास्तविक, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे आता देखील या विषयाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून ही निर्यातबंदी त्वरित उठवावी, अशी मागणी राहुल शेवाळे यांनी पत्रातुन केली आहे.

केंद्र सरकारने स्थानिक बाजारपेठांतील कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी 31 मार्च 2024 पर्यंत कांदा निर्यात बंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातले परिपत्रकदेखील केंद्र सरकारने काढले आहे. या निणर्याचा मोठा फटका कांदा उत्पादक शेतकर्‍यांना बसणार आहे. सरकारच्या या निणर्यावर शेतकर्‍यांनी आक्रमक पवित्रा घेताला असून आज ठिकठिकाणी आंदोलन केले. तसेच या निणर्याच्या निषेधार्थ जिल्ह्यात शनिवारपासून कांदा लिलाव बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी संघटनांनी घेतला आहे. चांदवड येथील कांदा व्यापार्‍यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे राज्यात पुन्हा एकदा कांदा प्रश्न पेटणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Dansari Anasuya : माओवादी ते तेलंगणा सरकारमध्ये काँग्रेसच्या मंत्री; दानसारी अनसूया ऊर्फ सीताक्का कोण आहेत?

शेतकरी वर्गात पुन्हा नाराजी

एकीकडे अवकाळी आणि गारपिटीने बळीराजा होरपळला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना हिवाळी अधिवेशनादरम्यान आर्थिक मदत होईल आणि दिलासा मिळेल अशी आशा होती, मात्र केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शेतकरी वर्गात पुन्हा नाराजी पसरली आहे. अनेक ठिकाणी कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी आंदोलने सुरू केली आहेत. दरम्यान आजच्या निर्णयापूर्वी केंद्र सरकारने ऑक्टोबरमध्ये ग्राहकांना दिलासा देण्यासाठी किरकोळ बाजारात 25 रुपये प्रति किलो या सवलतीच्या दराने कांदा देण्याचा निर्णय घेतला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -