घरताज्या घडामोडीखुशखबर! कांद्याचे दर घसरले

खुशखबर! कांद्याचे दर घसरले

Subscribe

तुर्कस्तानातून आयात केलेला कांदा सडू लागला आहे.

कांद्याच्या पिकाचे लांबलेला पाऊस आणि अवकाळीमुळे अतोनात नुकसान झाले होते. त्यामुळे काही महिन्यांपासून सर्वसामन्यांना रडवणाऱ्या कांद्याने शंभरी पार केली होती. त्यामुळे केंद्र सरकारला तुर्कस्तानातून कांदा आयात करावा लागला होता. मात्र हा आयात केलेला कांदा सडू लागल्याने त्याचा घाऊक दर ५ ते १० रुपयांवर आला. त्यामुळे आता राज्यातून बाजार समितीत आलेल्या कांद्याचे घाऊक दर २५ ते २७ रुपयांवर आले आहेत.

तुर्कस्तानातून आयात केलेला कांदा हा उरणच्या जेएनपीटी बंदरात ठेवण्यात आला होता. कांद्याची सर्वात जास्त मागणी ही हॉटेल व्यवसायिकांकडून होती. मात्र आता बाजारात मागणी वाढत असल्यामुळे दर २५ रुपयांपर्यंत कोसळले आहेत. त्यामुळे आयात कांद्याची मागणी घटली आहे. तसंच जेएनपीटीत सात हजार टन कांदा यामुळे सडू लागला आहे. हा कांदा मोठा असून तो बेचव आहे. यामुळे हॉटेल व्यावसायिकांनी या कांदाकडे पाठ फिरवली आहे. आता तो फेकून द्यावा लागत आहे. कांद्याचा दर फेब्रुवारीच्या अखेरीस आणखी उतरणार असल्याचे घाऊक व्यापारी मनोहर तोतलानी यांनी सांगितलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा – नवी मुंबईत ‘आप’ फॅक्टर, १११ जागा लढविणार!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -