घरCORONA UPDATE'टिलीमिली' पहिली ते आठवीचा अभ्यास शिका आता दूरदर्शनवर!

‘टिलीमिली’ पहिली ते आठवीचा अभ्यास शिका आता दूरदर्शनवर!

Subscribe

देशात २४ मार्च पासून लॉकडाऊन सुरू आहे. तेव्हापासून सर्व शाळा बंद आहेत. काही शाळांनी ऑनलाईन वर्गांना सूरवात केली आहे. पण देशात असणाऱ्या अनेक समस्यांमुळे अनेकांना डिजीटली शिक्षण घेणं शक्य नाहीये. कारण ‘स्मार्ट’ मोबाइल, इंटरनेटअभावी अडचणींमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा निर्माण झाला. म्हणूनच महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन (एमकेसीएल) या पुण्यातील स्वयंसेवी संस्थेने पहिली ते आठवीच्या मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी ‘टिलीमिली’ नावाची मालिका दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर सुरू केली आहे. राज्यातील सुमारे दीड कोटी विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे.

२० जुलै सकाळी ७.३० ते १२.३० वाजेपर्यंत प्रसारित केली जाणार आहे. बालभारतीच्या इयत्ता पहिली ते आठवी अभ्यासक्रमातील सर्व पाठांवर आधारित ही मालिका आहे. मालिकेचे एकूण ४८० भाग आहेत. प्रत्येक इयत्तेचा एक पाठ एका भागात असेल. प्रत्येक इयत्तेचे एकूण ६० भाग दाखवण्यात येणार आहेत. रविवारी या मालिका दाखवण्यात येणार नाही.

- Advertisement -

‘टिलीमिली मालिका मुलं आपल्या पालकांसोबत घरी बसून पाहू शकतील. शिवाय यातील भागांमध्ये विद्यार्थ्यांना स्वेच्छेने शिकवणाऱ्या काही व्यक्तींबद्दल देखील माहिती देण्यात आली आहे.

या प्रमाणे असेल मालिका

वेळ — इयत्ता

- Advertisement -

सकाळी ७.३० ते ८.०० — आठवी

सकाळी ८.०० ते ८.३० – सातवी

सकाळी ९.०० ते ९.३० — सहावी

सकाळी ९.३० ते १०.०० — पाचवी

सकाळी १०.०० ते १०.३० — चौथी

सकाळी १०.३० ते ११ — तिसरी

सकाळी ११.३० ते दुपारी १२ — दुसरी

दुपारी १२ ते १२.३० — पहिली


हे ही वाचा – Hope Mars Mission: ‘या’ मुस्लीम देशाने पहिलं यान मंगळावर पाठवलं!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -