घरताज्या घडामोडीपेपरग्लास खरेदीच्या बहाण्याने 91 हजारांना ऑनलाईन गंडा

पेपरग्लास खरेदीच्या बहाण्याने 91 हजारांना ऑनलाईन गंडा

Subscribe

पेपरग्लास खरेदीच्या बहाण्याने 91 हजारांचा ऑनलाईन गंडा
पंचवटी : परिसरातील दुकानात काम करणार्‍या कामगाराला पेपर ग्लास खरेदीच्या बहाण्याने क्यूआर कोड पाठवून हायटेक भामट्याने तब्बल ९१ हजार रुपयांना ऑनलाइन गंडा घातला. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पंचवटी परिसरातील एका दुकानात ग्राहकाने ऑनलाइन पेपरग्लास खरेदीसाठी मागणी केली होती. मालकाने दुकानात कामाला असलेल्या दीपक वाल्मीक डावरे यास संबंधित ग्राहकाची मागणी नोंदवून त्यांना मालाची विक्री करण्यास सांगितले. दीपक डावरे याला संशयित आरोपीने क्यूआर कोड पाठवून तो स्कॅन करून रक्कम स्वीकारण्यास सांगितले. दीपकने क्यूआर कोड स्कॅन करताच क्षणाचाही विलंब न लावता पहिल्यांदा तेराशे, दुसर्‍या वेळेस ९ हजार ९९९, पुन्हा २२ हजार २२२ आणि शेवटी ५ हजार ५५५ असे एकूण ९१ हजार २७५ रुपये त्याच्या खात्यातून गायब झाले. खात्यातून पैसे गेल्याचे समजताच दीपकने त्यांच्या मालकाला माहिती दिली. याप्रकरणी सायबर गुन्हे शाखेत तक्रार दाखल केली असून पुढील तपास सायबर गुन्हे शाखेचे पोलीस करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -